नगर (प्रतिनिधी)- महानगरपालिकेने शहर बस सेवा ही बालिकाश्रम रोड मार्गे सुरू करावी आणि या मार्गावर थांबे द्यावेत अशी मागणी बालिकाश्रम रोडवरील ओम सुप्रभात ग्रुपचे सदस्य तथा एडवोकेट अशोक गायकवाड यांनी मागणी केली आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, सध्या अहिल्यानगर शहरातील बहुतेक रस्त्यांची कामे जोरात सुरू आहेत. दिल्ली दरवाजा ते सिव्हिल हॉस्पिटल रस्त्याचेही काम सुरू आहे. त्यामुळे बहुतांश सावेडीकडून दिल्ली दरवाजा व दिल्ली दरवाजाकडून सावेडी वाहतूक ही बालिकाश्रम रोड ते हॉटेल पंचशील सावेडी यामार्गे दोन्ही बाजूने जोरात सुरू आहे. तसेच या मार्गाने शहर बस वाहतूक निंबळक व. एम आय डी सी.करीता सध्या रोजच सुरू असल्याचे दिसून येत आहे.
महापालिकेने बालिकाश्रम रोडमार्गे शहर बस वाहतूक नियमित सुरू करावी. ज्याचे बस स्टॉप हे आर्यन गार्डन(सुडके मळा), गोंदवलेकर महाराज मंदिर(बोरुडे मळा ) महालक्ष्मी उद्यान (भुतकर वाडी), व खंडोबा मंदिर (परीचय हॉटेल) सावेडी असे असावेत, अशी मागणी या परिसरात राहणारे नागरिक करत आहेत.