“मोबाईल न दिला… आणि अथर्वने आयुष्यच संपवलं!”
छत्रपती संभाजीनगरमध्ये १६ वर्षीय तरुणाची आत्महत्या, डोंगरावरून उडी मारत घेतला जीव

छत्रपती संभाजीनगरमध्ये १६ वर्षीय तरुणाची आत्महत्या, डोंगरावरून उडी मारत घेतला जीव
फक्त मोबाईल न दिल्यामुळे… बुलढाण्याच्या अथर्व तायडे या १६ वर्षीय मुलाने थेट डोंगरावरून उडी मारून आत्महत्या केली!
ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमधल्या साजापुर परिसरात उघडकीस आली आहे.
पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या अथर्वने पालकांकडे मोबाईलसाठी हट्ट केला होता. पण सध्या नको, असं सांगितल्यावर त्याने हे टोकाचं पाऊल उचललं…
रविवारी डोंगरावरून उडी मारल्यानंतर मृतदेह चट्टाणी भागात आढळून आला. हॉस्पिटलमध्ये नेल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
समाजासाठी आलार्मिंग सिग्नल!
एका मोबाईलच्या नकारामुळे जीव देणं? ही फक्त बातमी नाही… हे आहे नव्या पिढीच्या मानसिक आरोग्याचं SOS!
मोबाईलचं व्यसन, मानसिक दबाव, एकाकीपणा – याकडे पालक, शिक्षक आणि समाजाने गांभीर्याने पाहिलं पाहिजे.
#RestInPeace अथर्व
एक चूक निर्णय, एक हरवलेलं आयुष्य, एक गप्प झालेली स्वप्नं…