निवडणुकीत आतापर्यंत उमेदवारांचा दणक्यात खर्च

अहमदनगर, शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यापूर्वी 48 तास अगोदर जाहीर प्रचार थांबला होता. या प्रचारावर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून किती खर्च केला? याची आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. त्यानुसार महायुतीचे सुजय विखे पाटील आणि सदाशिव लोखंडे यांनी सर्वाधिक खर्च केल्याचे दिसून येते. नगर लोकसभा मतदारसंघातील सुजय विखे पाटील यांनी 54 लाख 60 हजार रुपये खर्च केल्याचे सादर केले आहे. त्यांनी सादर केलेल्या खर्चात 84 हजारांची तफावत निघाली होती. निलेश लंके यांनी 31 हजार खर्च केल्याची माहिती आहे. तर यामध्ये एक लाख 65,000 ची तफावत दिसून आली. दुसरीकडे शिर्डी मतदार संघात सदाशिव लोखंडे यांनी 54 लाख 60 हजार रुपये खर्च केल्याचा सादर केलं. यामध्ये निवडणूक विभागाला 29 लाख 21 हजार रुपयांची तफावत दिसून आली होती. भाऊसाहेब वाकचौरे यांनी 32 लाख 24 हजार खर्च केल्याचे दिसून येत आहे. तर त्यांच्या खर्चात पाच लाख एकोणीस हजारांची तफावत दिसून आली.