अभिनेत्री दीपाली भोसले-सय्यद शिवसेना संवाद दौऱ्यावर

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मी  श्रीगोंदा तालुक्यातील शिवसेना सर्व गट आणि गण मध्ये उमेदवार देऊन निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन सिने अभिनेत्री दीपाली भोसले-सय्यद यांनी शिवसेना संवाद दौऱ्यात श्रीगोंदा येथे शिवसेना पदाधिकारी बैठकीत बोलताना केले
त्या म्हणाल्या शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी आपण श्रीगोंदयात लक्ष देणार आहे
या तालुक्यातील व मतदार संघातील३५ गावांसाठी लाभदायी असणाऱ्या साकळाई उपसा सिंचन प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सुरू केलेला लढा संपलेला नाही पुढील महिन्यात मुख्यमंत्री उध्दव  ठाकरे यांनी या विषयी वेळ देण्याचे मान्य केले आहे असेही दीपाली सय्यद यांनी सांगितले.
३ वर्षांपूर्वी आपण या प्रश्नी दीर्घकाळ उपोषण केले त्यावेळी मी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची टीका झाली पण मला तो प्रश्न राजकीय करायचा नव्हता म्हणून मी श्रीगोंदयात निवडणूक लढवली नाही असे स्पष्ट करून शेजारी पारनेर,कर्जत मध्ये पाणी मिळते मग श्रीगोंदयात अन्याय का?असा सवाल करून येथील जनतेला पाणी प्रश्न शिवसेना मार्फत सोडवून दाखवू
यावेळी तालुका प्रमुख बाळासाहेब दूतारे,संतोष खेतमाळीस, सुरेश देशमुख, बाळासाहेब नलगे आदींची भाषणे झाली