मिस्किन मळा येथे अपना पंजाब रेस्टॉरंटचे उद्घाटन

स्पेशल पंजाबी डिशेस व अमृतसरच्या पंजाबी लस्सीचा नगरकरांना घेता येणार आस्वाद

अहमदनगर (प्रतिनिधी)- गेल्या अनेक वर्षापासून हॉटेल व ढाबाच्या माध्यमातून स्वादिष्ट पंजाबी खाद्यसेवा देऊन ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या गंभीर परिवाराने सावेडी येथील मिस्किन मळा, गंगा उद्यान जवळ सुरु केलेल्या अपना पंजाब प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटचे उद्घाटन आमदार अरुणकाका जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेविका ज्योती गाडे, रणजितसिंह गिल, चिंटू गंभीर, कुणाल गंभीर, सोनू गंभीर, दीपेंद्रसिंह गिल, अमनदीपसिंह गिल, अमोल गाडे आदींसह गंभीर परिवार उपस्थित होते.
आमदार अरुणकाका जगताप म्हणाले की, नगरच्या हॉटेल व्यवसायामध्ये गंभीर परिवाराने पंजाबी खाद्य संस्कृतीचा अस्सल स्वाद नगरकरांना उपलब्ध करुन दिला आहे. गंभीर परिवाराने पंजाबी खाद्यात जिल्ह्यासह राज्यातील खवय्यांच्या जीभेवर अधिराज्य गाजवले आहे. पंजाबी थीमवर सुरु केलेले रेस्टॉरंट नगरकरांच्या पसंतीस उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले. चिंटू गंभीर यांनी प्रास्ताविकात दर्जेदार, स्वच्छ, स्वादिष्ट व्हेज खाद्यसेवा पुरविण्यासाठी गंभीर परिवार प्रयत्नशील असून, नगरकरांसाठी अपना पंजाब रेस्टॉरंट सुरु करण्यात आले आहे. यामध्ये स्पेशल पंजाबी डिशेसचा आस्वाद खवय्यांना घेता येणार आहे. विशेष म्हणजे अमृतसरची पंजाबी लस्सी या रेस्टॉरंट मध्ये मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. या रेस्टॉरंटच्या शुभारंभाप्रसंगी आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते व माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.