लग्नाळू लोकांची अजब मागणी
“लग्नाचं टेन्शन नको घेऊ, सरकारला विनंती करू…” लाडकी बहीण, लाडका भाऊनंतर लग्नाळू लोकांची अजब मागणी.
लाडकी बहीण योजना झाली, लाडका भाऊ योजना झाली आता लग्न जमत नसलेल्या लोकांच काय हा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. बेरोजगार तरुणांसाठीही सरकारने युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यान्वित केली आहे. याच योजनेला माझा लाडका भाऊ योजना असं संबोधलं जात असुन, दरम्यान लाडकी बहीण आणि लाडका भाऊ नंतर आता काही लग्नाळू लोकांनी सरकारकडे नवी मागणी केली आहे. एका तरुणाने हातात पोस्टर घेऊन सरकारकडे अजब मागणी केली आहे. तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेक तरुणांचे वय वाढत चालले आहे. तरी लग्न जुळत नसल्याने अनेकजण चिंतेत आहेत. मुलांच्या किंवा मुलींच्या अपेक्षा जुळणे, शिक्षण-नोकरी, घरची परिस्थिती आणि वैचारिक मतभेद अशा अनेक कारणांमुळे अनेकांची लग्न रखडली आहेत. दरम्यान कित्येक तरुणांना चांगली नोकरी नाही किंवा मुलगी नोकरी करत नाही म्हणून अनेक लग्न मोडली आहेत. किंवा लग्नच जुळत नाही अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थिती या लग्नाळू लोकांनी आता सरकारकडे मदतीची धाव घेतली आहे. एक तरुण हातात पाटी घेऊन उभा असलेला दिसतो आहे. त्याच्या पाटीकडे पाहून लोकांना हसू आवरत नाहीये. व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला आम्ही लग्नाळू हे गाणे ऐकू येत आहे. तरुणाच्या हातातील पोस्टरवर “लग्नाचं टेन्शन नको घेऊ, आपण सरकारला विनंती करू लाडकी सून आणि लाडका जावई योजना चालू करा” अशी मागणी केली जात आहे.
https://www.instagram.com/reel/C9xFB46IZjK/