व्हिजी कार्बन कंपनीमुळे प्रदूषणाचा कहर

नागरिकांच्या आरोग्याला धोका!

🌫
व्हिजी कार्बन कंपनीमुळे प्रदूषणाचा कहर — नागरिकांच्या आरोग्याला धोका!

📍 सुपा, पारनेर तालुका:
पारनेर रस्त्यालगत असलेल्या व्हिजी कार्बन एलएलपी कंपनीतून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असून, या कंपनीविरोधात ग्रामस्थांनी आता तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

⚠ काय आहे समस्या?
👉 जुन्या टायर वितळवून ऑईल तयार करण्याच्या प्रक्रियेत कोणतेही सुरक्षात्मक उपाय न करता काळ्या रंगाचे केमिकलयुक्त, दुर्गंधीयुक्त पाणी थेट पाझर तलावात सोडले जाते.
👉 हवेतून दुर्गंधीयुक्त व विषारी गॅसचा उत्सर्जन होत असून श्वसनाचे त्रास, डोळ्यांना जळजळ, त्वचाविकार नागरिकांना होत आहेत.
👉 पिण्याचे पाणीही दूषित आणि दुर्गंधीयुक्त होत असल्याने संपूर्ण परिसर धोकादायक स्थितीत आहे.

📌 नागरिकांचा इशारा:
स्थानिकांनी सुपा आणि हंगा ग्रामपंचायत, सुपा पोलिस स्टेशन व औद्योगिक व्यवस्थापनाला निवेदन दिले आहे. कारवाई न झाल्यास मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.

📝 निवेदनावर स्वाक्षऱ्या केलेले प्रमुख ग्रामस्थ:
नंदकुमार पवार, निखिल पवार, शुभम पवार, विलास पवार, सुभाष ढवळे, नामदेव पवार, ऋषिकेश पवार, बाळासाहेब नवले, युवराज पवार, विशाल ठोंबरे, संकेत मांडगे, निरंजन पवार, सुरेश पवार, सार्थक पवार आणि इतर ३० हून अधिक ग्रामस्थ.

 

🙏 आमची मागणी:
👉 तातडीने कंपनीविरोधात कठोर कारवाई व्हावी.
👉परिसरातील पाणी व हवेचे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात.

👉 ग्रामस्थांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी आरोग्य शिबिर आयोजित करावीत.