शहरातील रस्त्याच्या संदर्भात मनपा प्रशासनाचा भोंगळ कारभार.
खड्डेमय शहर हा कलंक कधी मिटणार
महानगर पालिका हद्दीतील रखडलेले रस्त्याचे ड्रेनेजचे काम त्वरित चालू करण्यात यावे व कासवाच्या गतीने चालू असलेले कामाला गती देण्यात यावी या मागणीचे समाजवादी पार्टीच्या वतीने महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांना निवेदन देण्यात आले यावेळी समाजवादी पार्टीचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष अजीम राजे समवेत शाहबाज बॉक्सर, जहीर सय्यद, राजेंद्र गायकवाड़, हुसैन शेख, मोहम्मद हुसैन, परवेज खान, मुबीन सय्यद, शफी खान, नादिर भाई, गुड्डू शेख आदि उपस्थित होते.
नागरिकांची होत असलेली गैरसोय व रस्त्याचे रखडलेले खड्डे यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे राजकीय दबावाने रस्त्याचे काम संथ गतीने होत असून त्याला गती कधी देणार महानगरपालिका हद्दीतील चालू असलेले रस्त्याचे कामाचे फोटो काढून फक्त विकास होत असल्याचा दाखवून राजकीय पोळी भाजत आहे खड्डेम्य शहर हा कलंक कधी मिटणार ? कदाचित निवडणुकीची तर वाट पाहत नसाल ना असा प्रश्न निर्माण होत आहे व सध्या शहरांमध्ये रस्त्या संदर्भात महानगरपालिकेचा पूर्णपणे भोंगळा कारभार चालू दिसत असल्यामुळे ठेकेदार देखील आपली पोळी भाजून घेत असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे व अत्ता शहरांमध्ये जे रस्त्याचे काम चालू आहे ते संपूर्ण निकृष्ट दर्जाचे चालू असून त्याची पाहणी देखील महानगर पालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्याने केलेली नसून त्याचीदेखील पाहणी करून काम किती दर्जेदार चालू आहे याची दखल घेण्यात यावी तसेच महानगरपालिका हद्दीतील ड्रेनेज पाईप लाईन व रस्त्याचे काम 15 दिवसाच्या आत चालू करण्यात यावे अन्यथा बेमुदत उपोषण समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.