
तेहरान/वॉशिंग्टन, 22 (PTI)
इराण-इस्राइल संघर्षात अमेरिकेने उडी घेतली आहे. आज पहाटे इराणमधील नातांझ, फोदो॔ आणि इस्फहान या तीन अणुकेंद्रांवर बंकर बस्टर बॉम्ब टाकण्यात आले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्यात या तिन्ही अनु केंद्रांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केला आहे.
इराणने प्रत्युत्तर देत स्पष्ट इशारा दिला की, “आता चर्चा करण्याची वेळ संपली आहे. आमच्या संरक्षणाचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे!”
इस्राइलवर इराणचा प्रतिहल्ला:
इराणने इस्राइलवर क्षेपणास्त्रांचा मारा केला आणि काही प्रमाणात नुकसान घडवले.
इस्राइलमधील 80 हून अधिक लोक जखमी
तेल अवीव मधील इमारती आणि रस्त्यांचे नुकसान
अमेरिकेचा हल्ला:
B2 बॉम्बर्समधून 13,000 किलो वजनाचे बंकर बस्टर बॉम्ब वापरले
जमिनीखालील फोदो अनु केंद्राच्या प्रवेशद्वाराचे मोठे नुकसान
डोंगर फाटल्याने अनुकेंद्राचा प्रवेशमार्ग बंद
उपग्रह छायाचित्रांवरून दिसले:
फर्द अनु केंद्राच्या प्रवेशद्वाराचे नुकसान झाले आहे. केंद्राचे कामकाज सुरू ठेवण्यासाठी मलबा हटवावा लागणार आहे.
ट्रम्प यांचा इशारा:
“हे युद्ध संपवण्यासाठी इराणी आता तयार व्हावे.”
इस्राइलचा प्रतिसाद:
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ट्रम्प यांचे आभार मानले.
इस्राइलने इराणच्या क्षेपणास्त्र यंत्रणांवर हल्ला करत ती नष्ट केल्याचा दावा केला आहे.
इराण अणुऊर्जा संघटनेचा खुलासा:
“किरणोत्सर्ग झालेला नाही.”
प्रादेशिक युद्धाचा धोका वाढला आहे!