सर्जेपुरा परिसरातील धोकादायक इमारत उतरवण्याचे काम सुरू!
महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी यापूर्वीच इमारत मालकांना सूचना दिल्या होत्या की, इमारत स्वतःहून उतरवा, अन्यथा महापालिका जबरदस्तीने कारवाई करेल.
📍 सर्जेपुरा परिसरातील धोकादायक इमारत उतरवण्याचे काम सुरू!
प्रतिनिधी | अहिल्यानगर
अहिल्यानगर शहरातील सर्जेपुरा परिसरात असलेल्या अतीधोकादायक इमारतीचा धोकादायक भाग अखेर महापालिकेने हटवण्यास सुरुवात केली आहे. शहरातील अशा १५ अतिधोकादायक इमारतींपैकी ही एक असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
🛑 महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी यापूर्वीच इमारत मालकांना सूचना दिल्या होत्या की, इमारत स्वतःहून उतरवा, अन्यथा महापालिका जबरदस्तीने कारवाई करेल.
📌 सध्या मनपाच्या बांधकाम विभागाच्या अहवालानुसार १९७ इमारती धोकादायक अवस्थेत असून, त्यापैकी अनेकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
🏚️ काही इमारतींमध्ये अजूनही लोक वास्तव्यास आहेत, त्यामुळे धोका कायम आहे. यापैकी १६ इमारतींविरोधात न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून ती कायदेशीर मार्गाने मार्गी लावली जाणार आहे.
➡️ सर्जेपुरा प्रमाणेच महाजन गल्ली भागातील धोकादायक इमारतही लवकरच हटवण्यात येणार आहे.
🚨 सर्व इमारत मालकांनी प्रशासनाच्या सूचनांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा प्रशासनाची सक्त कारवाई अपरिहार्य ठरेल — असा स्पष्ट इशारा आयुक्त डांगे यांनी दिला आहे.
🧱 नागरिकांची सुरक्षितता हीच महत्त्वाची!