अखेर प्रभाग क्रमांक नऊ क मध्ये भाजप विजयी
महानगरपालिकेच्या एका जागेसाठी झालेल्या प्रभाग क्रमांक नऊ क मधील पोटनिवडणुकीत भाजपचे प्रदीप परदेशी यांचा विजय झाला आहे .
या प्रभागामध्ये भाजप आणि शिवसेना समोरासमोर असून, कोण बाजी मारणार याकडे शहराचे लक्ष लागले होते परंतु प्रदीप परदेशी यांनी शिवसेना-राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश तिवारी यांचा ६१७ मतांनी पराभव केला. तर शिवसेना राष्ट्रवादी महा विकास आघाडीचे तिवारी यांना 2589 भाजपचे परदेशी यांना 3106 तर मनसेचे पोपट पाथरे यांना 1751 मते पडली.
मंगळवारी या निवडणुकीसाठी मतदान झाले होते . छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी श्रीपाद छिंदम यांचे नगरसेवकपद रद्द झाले होते. या रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक झाली आहे . मध्यंतरी कोरोना कहर असल्याने या पोटनिवडणुकीत विलंब झाला होता .