अहमदनगर महापालिका हद्दीत गर्दीच्या ठिकाणी होणार कोरोना टेस्ट
देशात व राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णाचा संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे . त्यामुळे आरोग्य विभागासह प्रशासनाचा चिंता वाढलेल्या आहेत , या पृष्ठभूमीवर आयुक्त शंकर गोरे यांनी महापौर , उपमहापौर तसेच सर्व वैधकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अहमदनगर शहरात कोरोनाचे काटेकोर पणे पालन होण्यासाठी बाजारात गर्दी करणाऱ्यांवर, कोरोना नियमांचे उल्लंघन कारणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असून या साठी महापालिकेचे विशेष पथक काम करणार आहे . विशेष करून गर्दीची ठिकाणे बाजार व भाजी मार्केट अशा ठिकाणी नागरिकांनी गर्दी करू नये म्हणून ठीक ठिकाणी महापालिकेचे विशेष पथक विनमस्क फिरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करणार आहे तसेच त्यांचा आरटीपीसीआर टेस्ट केली जाणार आहे . ज्या नागरिकांनी लसीकरण करून घेतले नाही त्यांनी लसीकरण करून घ्यावे व नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आयुक्त शंकर गोरे यांनी आवाहन केलं आहे …