आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते महाआरती संपन्न
अहिल्यानगर (प्रतिनिधी) : शिवजयंती निमित्त उपमहापौर मालनताई ढोणे यांच्या संकल्पनेतील उत्सव तेलीखुंट पॉवर हाऊस चौकात अचानक मित्र मंडळाच्या वतीने साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनाच भव्य कटआऊट उभारून आकर्षक विद्युत रोषणाई करून ध्वनी क्षेपकावर शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे पोवाडे लावून आकर्षक असा देखावा या ठिकाणी साकारण्यात आला होता.
याच मार्गावरून शिवजयंतीची मुख्य मिरवणूक मार्गस्थ होती या मिरवणुकीत सहभागी मंडळांचे स्वागत ढोणे यांच्यावतीने करण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या दिवशी गणेश चतुर्थी असल्याने सुरुवातीला गणपती आणि शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करण्यात आली.
शिवजयंती निमित्त अचानक मित्रमंडळाचा देखावा
या चौकात सुनील गोडळकर सर आणि त्यांच्या पथकाने शिवकालीन मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर केली. यात तलवार बाजी, दांडपट्टा, लाठी काठी, पेटते पलिते आणि मशाली नाचवत हा खेळ दाखवण्यात आला. शिवकालीन युद्धनीती चे सदरीकरण या प्रात्यक्षिकाद्वारे दाखविण्यात आले. मनपा आयुक्त यशवंत डांगे यांचे स्वागत आणि सत्कार मालनताई ढोणे यांनी केला. यावेळी डांगे यांच्या हस्ते या मानधन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी यशवंत ढोणे , माजी नगरसेवक, दिलीप ढोणे , संजय ढोणे , सुभाष काका बायड, दिनेश मंजरतकर, बापू गीते, पियुष लुंकड, प्रवीण ढोणे , ऋषिकेश ढोणे, राहुल जाधव, तेजस डहाळे, अक्षय ढोणे, शुभम भळगट, निलेश दारुणकर, निखिल ढोणे , रोहन चंगेडिया , शशांक ढोणे, धीरज गोडळकर, विशाल चिंचोने लावेश राठोड , युवराज निंबाळकर , सुनील मोरे, सागर कंदुर , भाऊ कांबळे, शैलेश भागवत शांताराम बिडवे, अंकुर सुपेकर, श्रीकांत म्याना, रवींद्र डागवाले, अमोल ढोणे , दिलीप डागवाले, पांडुरंग चोथे जुंदरे भाऊ, महेश शिर्के, गौरव कुटे, निखिल ब्रम्हचंडी, शैलेश राशिनकर, यावेळी उपस्थित होते.
हा सोहळा यशवंत ढोणे , अजय ढोणे , दिलीप दारुणकर, अभयजी गुगळे, निखिल नहार त्रिलेश येनगंदुल, सुभाष बायड, मनोज येनगंदुल , प्रशांत पवळे यांच्या मार्गदार्नखाली संपन्न झाला, यासाठी त्रिशूल युवक मंडळ, अशोक मित्र मंडळ, वीर राजे युवा प्रतिष्टान, टिटवाळा गणेश प्रतिष्टान, साईनाथ मित्रमंडळ, तेलीखुंट मित्र मंडळ, श्री विघ्नहॅर्टा मित्र मंडळ, लक्ष्मी रिक्षा स्टॉप , रंग संस्कृती ग्रुप यांच्ये सहकार्य लाभले. या उत्सव अशा अनोख्या पद्धतीने साकारण्याची आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य कटआऊट गड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची पार्श्वभूमी असलेल्या फ्लेस्क पुढे उभे करण्याची संकल्पना दिनेश मंजरतकर, बापू गीते, तेजस डहाळे, जुबेर शेख, राम हुंडेकरी, राहुल जाधव, अभिजित ढोणे, राकेश मुनगेल, मुश्ताख शेख, अमित सुंकी, शुंभम सुंकी, व्यंकटेश कोल्पक यांची होती.