उमंग फाऊंडेशनच्या वतीने पिंपळगाव माळवी तलाव येथील आदिवासी कुटुंबीयांना कपड्यांची भेट
वांबोरी (ता. नगर) रस्त्यावरील पिंपळगाव माळवी तलाव पुर्ण क्षमतेने भरुन तलावाच्या शेजारी वास्तव्यास असलेल्या आदिवासी समाजाच्या पालात पाणी शिरल्याने काही महिन्यापूर्वी बिकट परिस्थिती उद्भवली होती. या आदिवासी बांधवांचे जिवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले असल्याने उमंग फाऊंडेशनच्या वतीने आदिवासी समाजाच्या पालावर जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. संतोष गिर्हे, उपाध्यक्ष संगीता गिर्हे, सचिव वैशाली कुलकर्णी, अॅड. महेश शिंदे, अॅड. भानुदास होले, अॅड. अनिता दिघे, अॅड. पुष्पा जेजुरकर, अॅड. प्रणाली चव्हाण, शाहीर कान्हू सुंबे, धिरज ससाणे, कल्हापुरे, महेंद्र गिर्हे, चांद शेख, नंदू खरपूडे आदी उपस्थित होते.
पिंपळगाव माळवी तलाव परिसरात 150 पेक्षा जास्त आदिवासी कुटुंबिय राहत आहे. तलावाचे पाणी घरात घुसल्याने त्यांचे जीवनावश्यक वस्तू वाहून गेले. उमंग फाऊंडेशन माणुसकीच्या भावनेने गरजू घटकांना आधार देण्याचे कार्य करीत आहे. सर्वसामान्य, गरजू घटकांना मदतीचा हात दिला जात असून, दुर्बल घटकातील कुटुंबीयांना प्रवाहात आनण्यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून कार्य केले जात आहे. पद्मश्री पोपट पवार यांच्या प्रेरणेने हा उपक्रम घेण्यात आला असल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. संतोष गिर्हे यांनी सांगितले.