कोरठण खंडोबा येथे मंगळवारी दि. २९ नोव्हेंबरला चंपाषष्टी रौप्य महोत्सव.
२५ व्या वर्षाचा भव्य चंपाषष्ठी रौप्य महोत्सव.
नगर- लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा, ता पारनेर, जि. अहमदनगर या राज्यस्तरीय “ब” वर्ग तीर्थक्षेत्रावर मंगळवार दि. २९ नोव्हेंबर २०२२ रोजी भव्य चंपाषष्ठी रौप्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री कोरठण खंडोबा मंदिराचा जीर्णोद्धार शुद्ध चंपाषष्टी दिनांक ५/१२/१९९७ रोजी परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांची हस्ते सुवर्ण कलशावरोहणाने ३ लाखावर भाविकांचे उपस्थितीत संपन्न झाला होता. तेव्हापासून देवस्थानचा हा चंपाषष्टी महोत्सव सुरू झाला. यावर्षी २५ व्या वर्षाचा भव्य चंपाषष्ठी रौप्य महोत्सव कोरठणगडावर २९ नोव्हेंबरला साजरा होत आहे.
चंपाषष्ठीला श्री खंडोबा मार्तंड भैरव अवताराने व मनी मल्ल दैत्यांचा संहार केला व सर्व देवतांना वरदान लाभले म्हणूनही चंपाषष्ठी महोत्सवाचे महात्म्य आहे. कुलधर्म कुलाचार तळी भंडार करण्याची खंडोबा भक्तांची प्रथा आहे. या चंपाषष्ठी पर्वणीत दिवसभरात हजारो खंडोबा भाविक भक्त उपस्थित राहतील. असा अंदाज धरून देवस्थान तर्फे सर्व नियोजन चालू आहे या महोत्सवाच्या निमित्ताने चंपाषष्ठी उत्सवात येथील श्री खंडोबा म्हाळसा घोड्यावरील भव्य पितळी मूर्ती मंदिराचा सातवा वर्धापन दिन आणि परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज मूर्ती ध्यान मंदिराचा सहावा वर्धापन दिन सोहळा संपन्न होईल.
चंपाषष्ठी महोत्सव दिनांक २९ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वा. श्री खंडोबा मंगल स्नान उत्सव मूर्तीचे सिंहासनावर अनावरण साज श्रुंगारासह पूजा व आरती, स. ६ वा.श्री खंडोबा अभिषेक पूजा आरती सकाळी ७ ते ९ वा. होमहवन,यज्ञ,स. ८.०० ते दहा वाजता संगीत भजन गोरेगाव ग्रामस्थांचा दिंडी सोहळा पिंपळगाव रोठा ते खंडोबा देवस्थान. स. ११.०० वाजल्यापासून महाप्रसाद वाटप सुरू राहील. स. १०.०० वा. डॉ. विकासानंद मिसाळ महाराज यांचे सुश्राव्य हरी किर्तन, दु. १.०० वाजता चांदीच्या पालखीतून शाहीरथात चांदीच्या उत्सव मूर्तीची भव्य शोभा मिरवणुकीने मंदिर व कोरठणगड प्रदक्षिणा,दु. १ वा. जगद्गुरु शंकराचार्य करवीर पीठ कोल्हापूर यांचे सत्संग दर्शन सोहळा देणगीदारांचा सन्मान, पालखीचे व्यासपीठावर आगमन मान्यवरांच्या उपस्थितीत चंपाषष्ठी उत्सवाची महाआरती होईल.
दु. १.०० वा वाजल्यापासून श्री खंडोबा गाणी स्पर्धा सुरु होतील ,चंपाषष्ठी उत्सवानिमित्त वाहने पार्किंग खंडोबा फाटा आणि मंदिराच्या पूर्व बाजूला सोय आहे. दि. २९ नोव्हेंबरला खंडोबा फाटा ते मंदिर हा १ किमी चा रस्ता वाहतुकीस दोन्ही बाजूने बंद राहील चंपाषष्ठीला पारनेर पोलीस, अहमदनगर पोलीस मित्र संस्था यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. देवस्थान तर्फे पिण्याचे पाणी, दर्शन व्यवस्था नियोजन करण्यात आले आहे.
तरी या महोत्सवात उपस्थित राहून भाविक भक्त जनतेने कुलदैवत स्वयंभू श्री खंडोबा चंपाषष्ठी महाप्रसाद आणि श्री खंडोबा म्हाळसा घोड्यावरील भव्य पितळी मूर्ती मंदिर,ब्रह्मलीन परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज मूर्ती ध्यान ,शाहीरथ पालखी सोहळा यांचे दर्शनाचा लाभ घ्यावा असे निवेदन देवस्थान तर्फे अध्यक्षा सौ शालिनी घुले, उपाध्यक्ष महेश शिरोळे मा.अध्यक्ष ऍड पांडुरंग गायकवाड सरचिटणीस जालिंदर खोसे,खजिनदार तुकाराम जगताप, चिटणीस कमलेश घुले, विश्वस्त सुवर्णा घाडगे, रामदास मुळे, राजेंद्र चौधरी, चंद्रभान ठुबे, धोंडीभाऊ जगताप ,महादेव पुंडे, अजित महांडुळे,दिलीप घुले,सुरेश फापाळे सर्व माजी विश्वस्त ग्रामस्थ व कोरठण पंचक्रोशी यांनी केले आहे.