खासदार डॉ. सुजय विखे कोरोना पॉझिटिव्ह .
खासदार विखे पाटील यांच्या वडिलांना म्हणजेच आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना या आधीच कोरोना झाला आहे. दोन्ही पिता-पुत्रांनी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांच्या विवाह समारंभात हजेरी लावली होती . याशिवाय खासदार विखे पाटील यांनी विळद घाट येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. विखे पाटील पिता-पुत्रांचा जनसंपर्क जिल्ह्यात सर्वात मोठा समजला जातो. त्यामुळेच संपर्कात आलेल्या व्यक्तींना स्वतःची कोव्हीड टेस्ट करावी व काळजी घ्यावी,असे आवाहनडॉ. सुजय विखे पाटील यांनी केलेले आहे.