खासदार लंकेंचा उपोषणाला पुर्णविराम

खा. लंकेंच्या तक्रारींची येत्या १५ दिवसात चौकशी होणार

अहमदनगर – अहमदनगर जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाबाहेर गेले, तीन दिवस खासदार निलेश लंके यांचे उपोषण सुरु होते. स्थनिक गुन्हे शाखेच्या भ्रष्ट अधिकारी व कर्मच्याऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी यावेळी केली होती. या उपोषणास जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या अनेके नेते व पदाधिकाऱ्यांनी पाठींबा दर्शवला होता. तसेच या उपोषण प्रसंगी जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या खा. लंकेंनी जाणुन घेतल्या. स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराबाबत खा. निलेश लंके यांनी केलेल्या मागण्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी गुरुवार (दि.२५) रोजी दिले आहे. कॉंग्रेस चे जेष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या शिष्टाईनंतर लेखी पत्र खा. लंके यांना देण्यात आले. त्यानंतर आ. थोरातांच्या हस्ते लिंबु पाणी घेउन लंके यांनी उपोषणास पुर्ण विराम दिला. नाशिक विभागाचे विषेश पोलिस महानिरिक्षक दत्तात्रय कराळे यांनी लंकेंच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी नाशिक ग्रामिण चे अतिरिक्त पोलिस अधिक्षक यांच्या नेतृत्वा खाली चौकशी समिती स्थापण करण्याचे आश्वासन दिले आहे. ही समिती येत्या १५ दिवसात अहवाल सादर करणार आहे. यावेळी अहमदनगरचे पोलिस अधिक्षक राकेश ओला यांच्याशी शिष्ठमंडळाने तीन वेळा चर्चा केली असता. ओला यांनी कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त केले आहे. खा.लंके यांच्याशी सविस्तर चर्चेनंतर आ. थोरात यांनी विषेश पोलिस महानिरिक्षक दत्तात्रय कराळे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याशी मोबाईल मार्फत चर्चा केली. शुक्ला व थोरात यांच्यात सकारात्मक चर्चा होउन उपोषणाला पुर्णविराम मिळाला. तसेच पोलिस अधिक्षक कार्यालयाकडून कराळे यांचे पत्र खा. लंके यांना देण्यात आले आहे.