गळफास घेऊन अल्पवयीन मुलीची आत्महत्या

सावेडी उपनगरातील घटना ; कारण अस्पष्ट

नगर : राहत्या  घरात दोरीच्या सहाय्याने छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला . सोनल अदिनाथ शिरसाठ ( वय १७ रा . भगवान बाबा चौक , निर्मलनगर , नगर ) असे मृत अल्पवयीन मुलीचे नाव आहे . याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .
 सोनलने कोणत्या कारणामुळे गळफास घेतला , याचा शोध तोफखाना पोलिस घेत आहेत . पोलिसांनी दिलेली माहिती अशी की , मंगळवारी रात्री घरामध्ये सोनलचे आई – वडिल , भाऊ झापले होते . रात्रीच्या वेळी सोनलने राहत्या घरात छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला . या प्रकाराची माहिती  बुधवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास तोफखाना पोलिसांना मिळाली .
सहायक पोलिस निरीक्षक जे . सी . मुजावर , पोलिस नाईक संभाजी बड़े यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली . सोनलच्या मृतदेहाचे शवविच्छेदन जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आले . पुढील तपास पोलिस नाईक बड़े करीत आहेत . दरम्यान , सोनलने आत्महत्या का केली , याचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून , या घटनेने निर्मलनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .