जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांसाठी महापालिकेत दोन व्हीलचेअर उपलब्ध.
अहमदनगर महानगरपालिकेत येणाऱ्या दिव्यांगांसाठी महापालिकेत दोन व्हीलचेअर उपलब्ध करण्याची मागणी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्यावतीने मनपा आयुक्तांना करण्यात आली होती या मागणीची दखल घेत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त महानगरपालिकेच्या वतीने दिव्यांगांना व्हीलचेअर ऊपलब्ध करुन अर्पण सोहळा अहमदनगर महानगरपालिका मध्ये करण्यात आले यावेळी अतिरिक्त उपायुक्त प्रदीप पठारे यांच्या हस्ते व्हीलचेअरचे पूजन करण्यात आले यावेळी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अँड. लक्ष्मण पोकळे समवेत शहराध्यक्ष विजय हजारे, पोपट शेळके, उपशहर प्रमुख संदेश रपारीया, हमीद शेख, किशोर सूर्यवंशी, राजेंद्र पोकळे, अरविंद नरसाळे आदीसह दिव्यांग बांधव उपस्थित होते. यावेळी बोलताना संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अँड लक्ष्मण पोकळे म्हणाले की महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या दिव्यांगांना कोणत्याही कामासाठी अधिकार्यांकडे गाणे येण्यासाठी अडचण निर्माण येतअसल्याने अपंग बांधवांना वेळ लागत होता आता पालिकेमध्ये व्हीलचेअर उपलब्ध असल्याने अपंगांना अडचण येणार नाही व आयुक्त,उपायुक्त यांनी अपंगांसाठी व्हीलचेअर उपलब्ध करून दिल्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.