जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या नवदुर्गांचा सन्मान

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या नवदुर्गांचा सन्मान

अहिल्यानगर – अनामप्रेम संस्थेत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या नवदुर्गांचा सन्मान अनामप्रेम संस्थेच्या गांधी मैदानातील हिम्मतभवन प्रकल्पात तसेच निंबळक येथील सत्यमेव जयते ग्राम प्रकल्पात संस्थेतील दिव्यांगांनी तयार केलेले नॅपकिन बुके व अनामामृत बहुगुणी थेंब ही उत्पादने देऊन मोठ्या उत्साहात करण्यात आला.
या कार्यक्रमास श्रीमती उषा पाटील (उप आयुक्त धर्मादाय कार्यालय), मा. कल्पना चव्हाण-गावडे (स.पो.नि. तोफखाना पोलीस स्टेशन), डॉ. सुवर्णा गणवीर, मा. ज्योती पुरी (प्राचार्या), मा. छायाताई गेरंगे (सरपंच इसळक), मा. सुजाता पायमोडे (सामाजिक कार्यकर्त्या), मा. गीता महाजन (दिव्यांगांच्या रीडर), मा. संगीता सुसर (कौन्सिलर), मा. वैशाली गादिया (हितचिंतक), मा. हष्मिता गांधी (सामाजिक कार्यकर्त्या), मा. शांताबाई पठाडे (भाजीपाला व्यावसायिक), मा. निलिमा खरारे (नगरच्या पहिल्या महिला रिक्षा चालक) या सन्मानार्थी उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना श्रीमती उषा पाटील मॅडम यांनी जागतिक महिला दिनाच्या स्थापनेचा इतिहास सांगून महिला दिनाचे महत्त्व विशद केले. महिलांनी समाजात वावरताना काय काळजी घ्यावी हे देखील त्यांनी उपस्थित महिला व दिव्यांग विद्यार्थिनींना समजावून सांगितले. तसेच अनामप्रेम दिव्यांग घटकासाठी करत असलेल्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले. स.पो.नि.कल्पना चव्हाण यांनी उपस्थित महिला व दिव्यांग विद्यार्थिनी यांना कायदेविषयक मार्गदर्शन करून सध्या चालू असलेल्या सायबर भामटेगिरी बाबत सावधान केले. कोणतीही अनोळखी लिंक मोबाईल मध्ये ओपन करू नये तसेच मोबाईलचा वापर आवश्यकतेनुसारच करावा असेही आवाहन केले. डॉ सुवर्णा गणवीर यांनी सद्य परिस्थितीत महिलांचे समाजातील स्थान याबाबत भाष्य केले तसेच अनामप्रेम संस्था चालवीत असलेल्या स्पायनल कॉर्ड इंजुरी रिहॅब सेंटर बाबत समाधान व्यक्त केले. मा. सुजाता पायमोडे यांनी संस्थेतील दिव्यांग विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या स्पर्धांची तसेच विविध गुणदर्शन कार्यक्रमाची तयारी करून घेणार असल्याचे सांगितले. प्रा. ज्योती पुरी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर इंग्रजी भाषा ही बोलीभाषा असल्याने महिलांनी इंग्रजी साक्षर व्हावे असा संदेश दिला.

अनामप्रेम मधील महिला कार्यकर्त्या व कर्मचारी यांचा देखील यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचलन श्रीमती सुरेखा कोतकर यांनी केले तर कु. सुरेखा राठोड यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका निभावली.
कार्यक्रमासाठी डॉ. मेघना मराठे, मा. अनिता माने, इंजि. अजित माने, ऍड. शामभाऊ असावा, ऍड. वैभव साबळे, डॉ. बापूसाहेब कांडेकर, डॉ. रविंद्र सोमाणी, इंजि. राधाताई कुलकर्णी, मा. अभय रायकवाड, मा. स्वाती रानडे, श्री संजय शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अनामप्रेम टीम मधील रामदास काकडे, विष्णू वारकरी, प्रवीण नवले, विक्रम प्रभू, राहुल खिरोडे, प्रकाश गजे, अक्षय राऊत, सुनील कांबळे, सचिन गारदे, उज्वला फुलसुंदर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.