डॉ.ए.पी.अब्दुल कलाम अभ्यास केंद्राच्या माध्यमातून मुकुंदनगरमध्ये एक नवीन शैक्षणिक पर्वाची सुरूवात – माजी न्यायमूर्ती बी. जे. कोळसे पाटील
पीस फौंडेशन व सक्षम फौंडेशन संचलित डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अभ्यास केंद्राचे उद्घाटन संपन्न
डॉ.ए.पी.अब्दुल कलाम अभ्यास केंद्राच्या माध्यमातून मुकुंदनगरमध्ये एक नवीन शैक्षणिक पर्वाची सुरूवात – माजी न्यायमूर्ती बी. जे. कोळसे पाटील
पीस फौंडेशन व सक्षम फौंडेशन संचलित डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अभ्यास केंद्राचे उद्घाटन संपन्न
नगर प्रतिनिधी : पीस फौंडेशन व सक्षम फौंडेशनने सुरू केलेले डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम अभ्यास केंद्र हे भावी पिढीकरीता उपयुक्त व दिशादर्शक ठरेल असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाची निवृत्त न्यायाधीश व माजी न्यायमूर्ती बी. जे. कोळसे पाटील यांनी अभ्यास केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी केले. आज मुलां इतकेच मुलीही शिकत आहेत. फक्त आयएस आयपीएस होण्याकरिता शिक्षण घेऊ नका तर समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिक्षण घ्या. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना भारताचा खरा इतिहास जाणून घेतला पाहिजे. तसेच त्याला समाजाचे प्रश्न देखील कळले पाहिजे असे बी.जे.कोळसे पाटील म्हणाले.
मुकुंद नगर मध्ये गरीब नवाज मस्जिद समोर पीस फौंडेशन व सक्षम फौंडेशन संचलित डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व माजी न्यायमूर्ती बी.जे.कोळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे अहमदनगर जिल्ह्याचे डीवायएसपी अनिल कातकडे, लॉ कॉलेजचे प्राचार्य तांबे सर, जामखेड आरटीआरचे प्राचार्य खालीद जहागीरदार, समन्वयक व पीस फौंडेशनचे अध्यक्ष आर्कीटेक्ट अर्शद शेख, सक्षम फौंडेशनचे अध्यक्ष शहानवाज तांबोळी, प्रकल्प प्रमुख व जहागिदार , साजिद जहागिरदार आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य तांबे सर म्हणाले की, आज शिक्षण महत्वाचे आहे याकरिता अवांतर वाचन ही तितकेच महत्वाचे आहे. सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी या अभ्यासिका केंद्राचा जास्तीत जास्त फायदा घेत नगर शहराचे नावं मोठे करावे. अभ्यास केंद्राला 5000 रूपराची पुस्तके भेट देत असल्राचे त्यांनी सांगितले.
डि.वाय.एस.पी. अनिल कातकडे म्हणाले की, मी देखील एका छोट्या गावातून या पदापर्यंत फक्त शिक्षणामुळे पोहोचलो आणि त्यात अभ्यासकेंद्राचा मोठा वाटा आहे. प्राचार्य खालीद जहागीरदार यांनीही मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविकात आर्कीटेक्ट अर्शद शेख यांनी डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम अभ्यासिका केंद्र सुरू करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की येथील अनेक विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षेत सहभाग घेत असताना त्यांना अभ्यास करण्यासाठी जागा नसते. याकरिता आम्ही हे अभ्यास केंद्र सुरू केले आहे. या माध्यमातून मुकुंदनगरचा आणि पर्यायाने अहमदनगर शहराचा शैक्षणिक विकास होईल. तसेच या केंद्राद्वारे मुकुंदनगर परिसरात अनेक शैक्षणिक उपक्रम राबविले जातील.
बबन सेठ चंगेडिया यांनी अभ्यास केंद्रासाठी 10 हजार रुपयाची पुस्तके देण्याचे जाहीर केले. याप्रसंगी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अल्ताफ मोहियोद्दीन शेख यांना नगर पोलिस दलात उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल मान्यवरांच्या व मुकुंदनगरवासियांकडून नागरी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अब्दुल कादिर सर रांनी केले तर आभार शहानवाज तांबोळी यांनी मानले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अर्शद शेख, अकीब शेख, सय्यद शहा, काझी शादाब, फरदीन जहागीरदार, अश्पाक शेख, तल्हा शेख, जाकीर शेख, तनवीन शेख, अश्पाक सय्यद यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरीकांनी उपस्थिती दर्शवली.