तलाव दुरुस्तीसाठी २ कोटींचा निधी मंजूर – राज्यमंत्री तनपुरे
राहुरी – – राहुरी मतदार संघातील व तालुक्यातील ताहाराबाद , वांबोरी , धामोरी खु. ,गुहा ,चिंचाळे, कनगर ,रामपूर , नगर तालुक्यातील बहिरवाडी व इमाम पूर येथील तलावांचा दुरुस्तीसाठी महाराष्ट्र शासनाचा जलसंधारण विभागाने २ कोटी २२ लाख ५ हजारांचा निधी मंजूर केला आहे अशी माहिती नगरविकास ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली .
मंत्री तनपुरे म्हणाले राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण योगदान ठरणाऱ्या पाझर तलाव दुरुस्तीसाठी ताहाराबाद ,वांबोरी , राऊत वस्ती , धामोरी खु .,गुहा खपके वस्ती ,चिंचाळे , गढधे आखाडा , कनगर घाडगे वस्ती , रामपूर सरोदे वस्ती , रामपूर साबळे वस्ती , नगर तालुक्यातील बहिरवाडी काळेवस्ती, बहिरवाडी वाकी वस्ती ,इमामपूर महादेव मंदिर रस्ता , इमामपूर पालखीचा ओढा , येथील पाझर तलाव दुरुस्तीसाठी, एकूण २ कोटी २२ लाख ५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे . राहुरी नगर तालुक्यातील तलावांचा दुरुस्तीची कामे बऱ्याच वर्षांपासून झालेली नाहीत . त्या तलावांची अवस्था बिकट असल्याने पाणी गळतीचे प्रमाण अधिक होते त्यामुळे तलाव लवकर कोरडे पडत होते , मंत्री तनपुरे यांच्याकडे लाभधारक शेतकऱ्यांनी तलाव दुरुस्तीची मागणी केली होती . या मागणीची त्यांनी दखल घेऊन मंत्री तनपुरे यांनी शासन पातळीवर पाठपुरवठा करून जलसंधारण विभागाने या तलाव दुरुस्तीसाठी निधी मंजूर केला आहे .