नगरचे सुपुत्र अॅड. सुनील करपे यांनी केला खोट्या अॅट्रॉसिटीचा पर्दाफाश
अहमदनगर : आपल्या राज्यात वाद काय नवीन नाहीत.अशातच खोट्या तक्रारी अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण सर्रास वाढताना दिसतय.आणि अनेक लोक कायद्याचा गैरवापर करताना दिसतायेत. दरम्यान इतक्यात पुणे जिह्यातील आळेफाटा येथे घडलेल्या दुर्दैवी प्रकारामध्ये माजी सैनिक नवनाथ भिमाजी शेटे यांच्यावर एका वयोवृद्ध मजुराने पैशाच्या लालसेपोटी खोटी तक्रार केल्याची माहिती समोर आली. या प्रकरणात त्यांचा काहीही संबंध नसताना देखील खोडसाळपणाने त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला गेला. मात्र कोर्टाने त्यांना जामीन देत अॅट्रॉसिटीचा गुन्हा खोडुन काढला आहे, नगरचे सुपुत्र अॅड. सुनील नानासाहबे करपे व त्यांचे सहकारी अॅड. आदित्य गुरव आणि अॅड. गणेश होनराव यांनी खोट्या अॅट्रॉसिटीतुन शेटे यांची सुटका करत घटनेवरती प्रकाश टाकला आहे
आळेफाटा येथे माजी सैनिक नवनाथ भिमाजी शेटे सेवानिवृत्त झाल्यापासून आपल्या काळ्या आईची सेवा म्हणजेच शेती व्यवसाय करत आहेत. सोबतच त्याला जोड व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन आणि शेळीपालन करतात. दरम्यान त्यांना शेतकामासाठी मजूर लागत होते म्हणून त्यांनी बस स्टॅन्ड वरती जाऊन विचारपूस करताना फिर्यादी श्रावण नावजी मांडवे आणि नथू कोंडीबा काटे यांनी कामास होकार दिला.आणि त्यांची गरज आणि व्यथा पाहून शेटेंनी त्यांना आपल्या गाडीतून फार्महाउसवर नेले.कामाची माहिती नसल्याने आणि ते आपल्याला जमत नसल्याने नथू काटे यांनी पळ काढला. तर फिर्यादी श्रावण मांडवे यांनी शेटेंवर आपली बस स्टॅन्डवरून किडनॅपिंग करून फार्महाऊस मध्ये कोंडून ठेवले तसेच मारहाण आणि शिव्या देऊन वेठबिगारी करण्यास भाग पाडले. असं म्हणत शेटेंविरुद्ध कलम ३४४/३६५/३२३/५०४/३४ अंतगर्त पैशाच्या लालसेपोटी आणि गावातील काही राजकारणी लोकांच्या कानभरणीतून त्यांच्यावर खोटी तक्रार केल्याची माहिती समोर आली.ह्या खोट्या गुह्यात त्यांना ३१ जानेवारी अटक देखील करण्यात आली.आणि पुढे ३ फेब्रुवारीला नायालयीन कोठवडी सुनावण्यात आली तर, ९फेब्रुवारीला ₹२५,००० रोख रक्कम आणि २ साक्षांच्या आधारे त्यांची सुटका करण्यात अॅड. सुनील नानासाहेब करपे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना यश आलं. असे खोटे गुन्हे दाखल करून समाजामध्ये त्याचा दुरुपयोगसुद्धा होऊ शकतो हे या घटनेवरून सिद्ध होत आहे.