नागरिकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण करावेत – बाळासाहेब थोरात
अहमदनगर —- लसीचे दोन डोस घेणाऱ्यांना कोरोना झाल्यानंतर कोरोना संसर्गाचा जास्त त्रास होत नाही त्यामुळे शासन सातत्याने प्रयत्न शील असून नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घ्यावेत तसेच अवश्य असल्यास नागरिकांनी बुस्टर डोस सुद्धा घ्यावा तसेच परदेशात काही देशांनी मास्क न वापरण्याचा निर्णय घेतला कारण त्यांचे बुस्टर डोस सुद्धा पूर्ण झाला आहे ,म्हणून आपण आपली काळजी घेऊया , कारण कोरोनाचा थेट संबंध हा जीवाशी आहे म्हणून नागरिकांनी कोरोना संसर्ग पासून वाचण्यासाठी लसीचे डोस पूर्ण करावेत असे महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे .
विधानसभेने १२ आमदारांचा निलंबन केलं ते घटनेला धरून असून त्यात न्यायालयाने हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे कि नाही हे शोधावे लागेल पन आमदारांचे नीलमबन मागे घेण्याचा अधिकार हा सर्वस्वी सभागृहाचा आहे त्यात कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही असं मत नामदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं .सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र्र विधान सभेतील निलंबित १२ आमदारांचे निलंबन रद्द केल्याचा निर्णयावर थोरातांनी हे भाष्य केलं . नगर शहरात थोरात यांची पत्रकार परिषद झाली त्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिल .
तसेच राज्य शासनाने शॉपिंग मॉल मध्ये वाइन विक्रीस परवानगी दिली आहे या निर्णयाचे नामदार थोरात यांनी समर्थन केलं . मध्य विक्रीतून राज्याला महसूल मिळतो सरकार द्राक्ष लागवडीस व मध्य निर्मितीस प्रोत्सहन देते त्या मुळे हा निर्णय योग्य आहे . शासनांनी किराणा दुकानात सरसकट दारू विकण्यास परवानगी दिली नाही असे सांगत त्यांनी मंत्री मंडळाचा निर्णयाच समर्थन केलं आहे .