पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ फुटबॉल स्पर्धेत कु साक्षी जाधव हिस सुवर्णपदक
राजस्थान कोटा विद्यापीठ कोटा येथे पार पडलेल्या पश्चिम विभागीय फुटबॉल उमेन्स या स्पर्धेत सा.फु.पुणे विद्यापीठाच्या फुटबॉल या संघाने सुवर्ण पदकाची कामगिरी केली.
अहमदनगर विभागाची न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर या महाविद्यालयातील कु साक्षी जाधव (एफ.वाय.बीएस्सी) हिने चमकदार कामगिरी केली 5 जानेवारी 2022 मध्ये तामिळनाडू येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ फुटबॉल स्पर्धे साठी निवड झाली आहे.
या यशाचे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय नंदकुमार झावरे पाटील,उपाध्यक्ष आदरणीय रामचंद दारे साहेब ,सचिव आदरणीय जी.डी. खान्देशे साहेब ,सहसचिव आदरणीय विश्वासराव आठरे पाटील,खजिनदार मुकेशदादा मूळे ससंस्थेचे विश्वस्त,सदस्य व सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी.एच.झावरे,कला शाखेचेउपप्राचार्य डॉ बाळासाहेब सागडे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ संजय कळमकर सर्व विभागाचे विभागप्रमुख,प्रबंधक, ओएस, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
साक्षी जाधव हिस क्रीडा संचालक डॉ शरद मगर,प्रा सुधाकर सुंभे प्रा,धन्यकुमार हराळ,प्रा धनंजय लाटे,प्रा आकाश नढे प्रसाद पाटोळे सर या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.