पानसरे यांच्या पुस्तकात महाराजांचा एकेरी उल्लेख
किरण काळे यांनी ती पुस्तके न वाटण्याचा शिवराष्ट्र सेनेचा सल्ला
नगर —महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने व जिल्हाध्यक्ष किरण काळे हे कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांनी लिहिलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुस्तक वाटण्यात येणार आहे. या पुस्तकाच्या पाच हजार प्रति वाटण्यात येणार आहे पण या पुस्तकात आमचे दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख आहे. यामुळं महाराजांचा अपमान होत आहे तसेच आमच्या भावना दुखावल्या जात आहेत त्यामुळे सदर पुस्तक काँगेस अध्यक्ष किरण काळे यांनी वाटू नये असा सल्ला शिवराष्ट्र सेनेच्छा वतीने देण्यात आला आहे या कार्यक्रमाला शिवराष्ट्र सेनेचा प्रखर विरोध राहणार आहे असे निवेदन शिव राष्ट्र सेनेचे संतोष नवंसुपे यांनी दिले आहे. यासाठी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.