पारनेर नगरपंचायत च्या नगराध्यक्षपदी विजय औटी तर उपनगराध्यक्षपदी सुरेखा भालेकर

पारनेर : नगरपंचायतच्या नगरध्यक्षपदी आमदार नीलेश लंके यांचे कट्टर समर्थक विजय औटी यांची तर उपनगराध्यक्षपदी  सुरेखा अर्जुन भालेकर यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. दरम्यान नगरध्यक्षपदाच्या या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमतापर्यंत पोचता आले नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार नीलेश लंके यांनी अपक्ष व पारनेर शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांना बरोबर घेत बहुमत मिळविले.राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विजय सदाशिव औटी तर शिवसेनेतर्फे नवनाथ सोबले यांनी अर्ज दाखल केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत असल्याने औटी यांची निवड झाली.

उपाध्यक्षपदासाठी उद्योजक अर्जुन भालेकर यांच्या पत्नी सुरेखा भालेकर यांच्या नावावर काल राष्ट्रवादीत एकमत झाले. त्यानुसार सुरेखा भालेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांची बहुमताने निवड झाली. पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पदाच्या निवडसाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. पारनेर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून पारनेर – श्रीगोंद्याचे प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी काम पाहिले.