पावसाच्या कृपेने राज्यात जलसाठ्याचे चित्र उजळलंय!

अहिल्यानगर जिल्ह्यातील सीना धरणाने रचला नवा इतिहास!

🌧️
पावसाच्या कृपेने राज्यात जलसाठ्याचे चित्र उजळलंय!
📢 अहिल्यानगर जिल्ह्यातील सीना धरणाने रचला नवा इतिहास!

📌 राज्यातील पहिलं १००% भरलेलं धरण – सीना धरण, अहिल्यानगर जिल्हा!
पावसाच्या दमदार आगमनामुळे अनेक धरणांची जलपातळी वाढली असतानाच सीना धरणाने संपूर्ण क्षमतेने भरून नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे!
💧आता हे राज्यातील पहिलं पूर्णपणे भरलेलं धरण ठरलं आहे.


📊 इतर प्रमुख धरणांची स्थिती:

🔹 जायकवाडी – 53.93%
🔹 उजनी – 86.48% (70.43% उपयुक्त साठा)
🔹 कोयना – 40.35% (37.29% उपयुक्त साठा)

🟦 नाशिक विभाग:

  • गंगापूर: 59.72%
  • दारणा: 56.83%
  • गिरणा: 27.54%
  • हतनूर: 47.84%

🟩 मुंबई विभाग:

  • मोडक सागर: 51.34%
  • तानसा: 37.34%
  • भातसा: 45.55%

🟨 पुणे विभाग:

  • खडकवासला: 60.87%
  • पानशेत: 38.12%
  • मुळशी: 45.24%
  • वीर: 78.1%
    (वीर धरणातून 27,796 क्युसेक विसर्ग सुरू)

🟥 नगर जिल्हा:

  • भंडारदरा: 46.55%
  • निळवंडे: 41.36%
  • विसापूर: 88.71%
  • ✅ सीना धरण: 100% (राज्यात सर्वाधिक भरलेलं)

🌊 राजापूर बंधाऱ्यातून सर्वाधिक 73,042 क्युसेकने विसर्ग सुरू – नदीकाठच्या गावांना सतर्कतेचं आवाहन!

 

🧑‍🌾 शेतकऱ्यांमध्ये समाधान, नागरिकांमध्ये आशा
💬“आता पिण्याचं आणि शेतीसाठी पाण्याचं संकट दूर होणार!”