भरधाव कारची दुचाकीला धडक ;एक ठार एक जखमी
सुपा — पारनेर येथील सुपा येथे पुणे नगर महामार्गावर हॉटेल मातोश्रीजवळ भरधाव कारने दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे . हा अपघात दुपारी १ विजेचा सुमारास २ तारखेला घडला .
या बाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या महिरीनुसार दि. २ रोजी शशिकांत गवळी व त्यांचं पुतण्या अजित गवळी (रा . शहाजापूर ता. पारनेर )हे पुणे नगर महामार्गावरून एम एच १६ एएस ६०४० या मोटार सायकल वरून सुप्या चा दिशेने चालले होते . या वेळी पुण्याकडून आलेल्या एम एच १२ के इ ३०४६ या भरधाव करणे गवळी यांचा दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली , या अपघातात शशिकांत गवळी यांचा जागीच मृत्यू झाला तर मोटार सायकल चालक अजित गवळी हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले . शशिकांत गवळी यांचा मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णलयात उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांचा ताब्यात देण्यात आला .