मनपाची निवडणूक स्वबळावर लढवणार
नुकत्याच झालेल्या प्रभाग क्रमांक ९ चा पोट निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवाराचा पराभव झाल्यांनतर काँग्रेस ने घेतलेल्या मंथन बैठकीत आगामी मनपाची निवडणूक स्वबळावर लढवण्याची आवई दिली . तसेच राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाने भाजपशी सलगी केल्याचा आरोपही या बैठकीत करण्यात आला .
शहर जिल्हा काँग्रेसची मंथन बैठकीत कालिका प्राईड येथील पक्ष कार्यालयात झाली . राष्ट्रवादीने महाविकास आघाडीचा उमेदवाराला पराभूत करून विजयी झालेल्या भाजप उमेदवाराचा सत्कार केल्याबद्दल यावेळी काँग्रेस पदाधिकारी ,कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली . शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणाले ,शहरातील काही नेते मंडळी एका पक्षात राहून शहरातील सर्वच पक्ष आम्ही चालवतो अशा आविर्भावात आहेत पोट निवडणुकीत महाआघाडी चा शिवसेना उमेदवार पराभूत झाला . याची खंत काँग्रेस ला आहे . शिवसेना व काँग्रेस चे संबंध चांगले आहेत . कार्यकर्त्यांचा भावना काँग्रेस मंत्री बाळासाहेब थोरात व प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना कळवल्या जातील . आपल्याला मनपावर काँग्रेस चा झेंडा फडकायचा आहे . भाजपला सत्तेपासून रोखायचे गत अडीच वर्ष भाजपने शहरात राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सत्ता उपभोगली . मात्र या अभद्र युतीने शहर भकास करून ठेवले असे काळे यांनी बैठकीत सांगितले . या वेळी ओबीसी काँग्रेस चे शहर जिल्हाध्यक्ष अंनतराव गारदे , शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद , निजाम जहागीरदार , डॉ हनीफ शेख , प्रा. डॉ बापू चंदनशिवे , जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते , ऍड अक्षय कुलट , जिल्हाध्यक्ष अज्जू भाई शेख , अरुण धामणे आदी उपस्थित होते .