महसुल मित्र दैनंदिनीचे पद्मश्री पोपटराव पवार यांचे हस्ते प्रकाशन.
अहमदनगर जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालये, वर्तमानपत्रांच्या कार्यालयांची माहीती असलेल्या महसूल मित्र दैनंदिनी २०२२ चे प्रकाशन आदर्श गाव हिवरेबाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांचे हस्ते नुकतेच झाले. दैनंदिन कामकाजात अतिशय उपयुक्त माहीती असलेल्या महसूल मित्र दैनंदीनीचे हे ७ वे वर्ष असल्याची माहीती संपादक अभय ललवाणी यांनी दिली. महसुल मित्र दैनंदिनी २०२२ चे प्रकाशन पद्मश्री पोपटराव पवार यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी दैनंदिनीचे संपादक अभय ललवाणी, चांद सुल्ताना हायस्कुलचे चेअरमन हाजी नजीर अहमद (नज्जु पैलवान ), सामाजिक कार्यकर्ते उबेद शेख, प्राचार्य खलील शेख सर, गोरक्षनाथ बांदल, उल्हास नांगरे, अँड हनीफ बाबू आदी उपस्थित होते.