रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम सुरु,अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

नगर शहरात भिंगार येथील वडारवाडी भागात नॅशनल हायवे २२२ चे काम  सुरु असून  हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे . असा आरोप सामाजिक कार्यकर्ते शरद बडे यांनी केला आहे . याकडे संबंधित अधिकारी जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे 
       भिंगार येथील वडारवाडी भागात नॅशनल हायवे २२२ चे काम  सुरु आहे . या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्या शरद बडे यांनी पाहणी केली असता मातीवर डांबर न टाकता खडी  व कच  यांचे  एकत्रित केले ते मिश्रण रस्तावर टाकून नागरिकांचा पैशाचा दुरुपयोग संबंधित ठेकेदार करत आहे . शासनाने ठरवून दिलेले नियम संबंधित ठेकेदार  धाब्यावर बसून अत्यंत निकृष्ट प्रतीचा रस्ता तयार करण्याचे काम करत आहे .या रस्त्याची पडताळणी करून  संबंधित अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे .