लायन्स क्लबच्या संयुक्त बैठकित सामाजिक कार्याचा जागर;

लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, अहमदनगर प्राईड व लिओ क्लब ऑफ अहमदनगर या तिन्ही क्लबची संयुक्त आढावा बैठक शहरातील स्कायब्रीज येथे पार पडली. यावेळी पदाधिकारी व सदस्यांना मार्गदर्शन करताना प्रांतपाल कोठावडे बोलत होते. याप्रसंगी रीजन चेअरमन सुनील साठे व झोन चेअरमन आनंद बोरा यांची प्रमुख उपस्थिती होती.

लायन्स क्लबने सामाजिक भाव जागृत करुन, वंचितांना आधार देण्याचे काम केले आहे. माणुसकीने माणुस जोडून सेवाभाव जपडण्याचे कार्य सुरु आहे. हाच संस्कार लिओ क्लबच्या माध्यमातून भावी पिढीत रुजवून सामाजिक नेतृत्व निर्माण करण्याचे कार्य लायन्स करत आहे. क्लबमध्ये जात, पंथ व धर्मापलीकडे जाऊन सर्व माणुसकीच्या भावनेने एकवटले आहे, असे प्रांतपाल कोठावडे म्हणाले.

याप्रसंगी तिन्ही क्लबचे अध्यक्ष, सचिव व खजिनदार यांनी आपला अहवाल सादर केला. याप्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. सिमरनकौर वधवा, अभिजीत भळगट, हरमनकौर वधवा, सचिव प्रणिता भंडारी, सनी वधवा, खुशबू माखीजा, खजिनदार प्रिया मूनोत, मनयोग माखीजा, प्रिशा बजाज, प्रीती बोरा, दिशा तलवार आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.