विखे अभियांत्रिकीत डिपेक्स २०२५-संकल्पना सादरीकरण 

विखे अभियांत्रिकीत डिपेक्स २०२५-संकल्पना सादरीकरण 

नगर – डिपेक्स सारखे स्पर्धात्मक उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक वृत्ती जोपासण्यास मदत करते. तसेच आधुनिक विषय आत्मसात करुन त्यामधील तंत्रज्ञान अद्ययावत करुन त्याचा वापर करुन दैनंदिन जीवन कसे सुकर व सुरक्षित बनवले जाईल याचा अनुभव विद्यार्थ्यांना विद्यार्थीदशेतच येतो, त्याचबरोबर या प्रकारच्या स्पर्धेमधुन विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्ती विकसीत होण्यासाठी वाव मिळतो.  अशा प्रकारच्या स्पर्धांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा,असे प्रतिपादन मुख्य अतिथी जयद्रथ खाकाळ यांनी केले.
       डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याकडे लक्ष देतेच, त्याचबरोबर विद्यार्थ्यांमधील व्यक्तिमत्व विकास, तांत्रिक कौशल्य विकास व संभाषणकौशल्य तसेच त्यांच्यातील संशोधन वृत्ती वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील असते.याचाच एक भाग म्हणून,अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सृजन डिपेक्स सेंटर,आय.क्यु.ए.सी.सेल, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर जिल्हयातील विद्यार्थ्यांच्या संशोधनास वाव देण्यासाठी “डिपेक्स २०२५-संकल्पना सादरीकरण फेरी ” या प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
    या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून   अहिल्यानगर ए.ए.एम.आय.चे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ हे होते. कार्यकमाचे अध्यक्ष डॉ. विखे पाटील फौंडेशन संचालक तंत्र सुनिल कल्हापुरे,  अहमदनगर सन्मानित अतिथी अहिल्यानगर आय. ई. आय. लोकल सेंटरचे चेअरमन भारतभूषण भागवत, सिध्दी स्टॅम्पीग्जचे सुनील कानवडे, डॉ. विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय नाईक, तसेच समन्वयक अभाविप संकल्प फळदेसाई, अभाविप शहर समन्वयक उत्कर्ष परदेशी, तंत्रशिक्षण विद्यार्थी कार्य देवगिरी प्रदेशचे संयोजक  वैभव चव्हाण, अभाविप विभाग संघटन मंत्री अमोद कुलकर्णी आदि उपस्थित होते. सर्व उपस्थित मान्यवर व परीक्षक यांचा परीचय व स्वागत आय टी विभाग प्रमुख डॉ.दीपक विधाते यांनी केले.

डिपेक्सचे स्पर्धात्मक उपक्रम  विद्यार्थ्यांना संशोधनात्मक वृत्ती जोपासण्याची संधी-खाकाळ

 या प्रसंगी  सुनिल कानवडे, सिध्दी स्टॅम्पीग्ज यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कुठलेही काम करण्याची तयारी ठेवा त्यातून यश हमखास मिळेल. त्यामुळे काम हेच ध्येय ठेवून मेहनत करत राहण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले.
     यावेळी विखे पाटील फाउंडेशनचे संचालक तंत्र सुनील कल्हापुरे यांनी अभियंता या शब्दाचा अर्थ समजावून सांगताना त्याची निर्मिती कशी झाली आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध संशोधन संधी आणि आव्हाने काय आहेत हे सांगून, एज्युकेट, एन्करेज अॅण्ड एम्पॉवर या तीन तत्वावर आपण कार्यरत रहावे असे सांगितले. यावेळी अभियांत्रिकी व इतर क्षेत्रातील विविध शाखांच्या एकुण २३८ संकल्पना सादरीकरण करण्यात आल्या.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. सौ.पी.एस.गायके, प्रा.सौ. माधवी काळे यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन यश निंबाळकर यांनी केले.
      या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन डॉ. विखे पाटील फौंडेशन, अहमदनगरचे संचालक सुनिल कल्हापुरे, डॉ. विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय नाईक तसेच शिक्षक समन्वयक डॉ. दीपक विधाते, डॉ. सुशील मगर, तसेच अभाविप चे विद्यार्थी उत्कर्ष परदेशी, यश निंबाळकर, आनंद गांधी, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.
       या कार्यक्रमाचे व उपक्रमाचे अहिल्या नगरचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार डॉ.राधाकृष्ण विखे पाटील, डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, तसेच डायरेक्टर जनरल डॉ.पी.एम.गायकवाड यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.