शहराला मिळणार पाइप लाइनद्वारे गॅस . चार प्रभागात प्रयोग -पुढची महिन्यात काम सुरु होणार
पुणे मुंबई चा धरतीवर अहमदनगर शहरात गॅस देण्याची योजना सुरु होत आहे . प्रारंभी प्रभाग क्रमांक २,४,५,६मध्येपुढील महिन्यात हे काम सुरु होणार आहे . नंतर इतर प्रभागात या योजनेचे काम सुरु होणार आहे. अहमनगर शहरात घरगुती गॅस पुरवण्यासाठी ठीक ठिकाणी एजन्सीचे कार्यालये आहेत . तेथून गाड्या पाठवल्या जातात . अनेकदा गाड्या उशिरा गेल्याने ग्राहकांचा मनस्ताप होतो . तसेच प्रत्येकी एका टाकी मागे ग्राहकाला २० रुपये वाहतूक खर्च काही एजन्सीज घेतात . त्या बाबत नागरिकांमध्ये नाराजी होते . गॅस नियमित पणे मिळावा या साठी अनेक वर्षांपासून प्रयन्त सुरु आहेत , माजी महापौर बाळासाहेब वाकळे यांचा काळात नगरसेवक स्वप्नील शिंदे यांनी प्रारंभी संकल्पना मांडली आमदार संग्राम जगताप यांचा मार्गदर्शनाखाली प्रस्ताव तयार करण्यात आला होता .त्यांनीच या कामासाठी पाठपुरवठा केला होता . हे काम आत लवकरच सुरु होणार आहे .