शहर व जिल्ह्यात सेक्सरॅकेट चालविणार्या त्या महिलेचा पर्दाफाश करण्याची मागणी
फिरोज पठाण यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
शहरात व जिल्ह्यात बेंगलोर, कलकत्ता, पुणे-मुंबई या भागातून मुली मागवून देहविक्रीचा व्यवसाय चालवणार्या केडगाव येथील त्या महिलेचा पर्दाफाश होण्यासाठी तिच्या मोबाईलची सीडीआर तपासणी करण्याची मागणी फिरोज पठाण याने पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदर महिलेने 29 हजार रुपयाच्या उधारीपोटी तब्बल 2 लाख रुपये उकळले असून, सदर महिला त्रास देत असल्याचा आरोप पठाण यांनी केला आहे.
पठाण यांची केडगाव येथील त्या महिलेची ओळख एका सामाजिक संस्थेच्या कार्यालयात झाली होती. त्या महिलेशी मैत्री झाल्यानंतर तीचा खरा व्यवसाय समजला. सदर महिला शहरात व जिल्ह्यात मुली पुरवण्याचे काम करीत आहे.नगरच्या बस स्थानक येथील एका हॉटेल मध्ये तर मांडवगण फाटा येथील एका ढाब्यावर तिने देहविक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. तिचे रॅकेट संपूर्ण भारतामध्ये आहे. बेंगलोर, कलकत्ता, पुणे-मुंबई या भागातून महिला देही विक्रीसाठी मागवल्या जातात. या महिलेची चौकशी केल्यास मोठे सेक्स रॅकेट उघडकिस येण्याची शक्यता आहे. सदर महिलेकडून काही पोलीस आर्थिक देवाण-घेवाण करत असल्याने तिच्यावर कारवाई होत नाही. शहर व जिल्ह्यात फोनद्वारे ही महिला अनेकांना मुली पुरवण्याचे काम करते. या रॅकेटमध्ये काही अल्पवयीन मुली सुद्धा अपहरण करून आनले जात असल्याचा आरोप पठाण यांनी केला आहे.
तर दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, या महिलेकडून पत्नी आजारी असताना 29 हजार रुपये उसने पैसे घेतले होते. सदर पैसे परत करता आले नाही. माझ्याकडे एका सामाजिक संस्थेत मुख्यमंत्री सहायता निधीतून वेश्याव्यवसाय करणार्या महिलांना आलेल्या अनुदान वाटपासाठी यादी बनविण्याचे काम होते. या महिलेने दिलेले 126 नावे सदर यादीत टाक, नाहीतर माझे पैसे परत द्या. अशी धमकी दिल्याने मी घाबरलो. तिने मला संपूर्ण यादी दिली. सर्व नाव एकसारखी असल्याने ही खोटे नाव टाकण्यास नकार दिला होता. सदर महिलेने त्या सामाजिक संस्थेला देखील ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आहे. कोणत्याही खोट्या गुन्ह्यात अडकवेल अशी धमकी देते आहे. त्या महिलेने दिलेल्या उसनेपैसे परत करण्यासाठी दागिने, गाडी विकून व उधारी करुन 29 हजारापोटी 2 लाख रुपये दिले. परंतु अद्याप ही महिला त्रास देत आहे. या गोष्टीमुळे मी कार्यरत असलेल्या त्या सामाजिक संस्थेमधून देखील काढण्यात आले आहे. सदर महिला व त्याच्या मुलाकडून माझ्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
पोलिसांनी मदत केल्यास सदर महिलेचे सर्व अवैध धंदे दाखवून देण्याची तयारी पठाण यांनी दर्शवली आहे. मात्र पोलिसांनी कुटुंबीयांना संरक्षण देऊन सदर महिलेवर कारवाई करुन न्याय देण्याची मागणी केली आहे. अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर सहकुटुंब आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.