शिव राष्ट्र सेनेचा वतीने आयुक्तांना निवेदन

अहमदनगर (दि ,१९) — अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील प्रोफेसर चौक व अप्पुहत्ती चौक येथील धोकादायक जाहिरात कमानी हटवण्यासाठी  शिव राष्ट्र सेनेचा वतीने आयुक्तांना निवेदन देण्यात आले . या वेळी शुभ राष्ट्र सेनेचे पक्षाध्यक्ष संतोषी नवसुपे शिव राष्ट्र  युवासेना प्रमुख शंभुराजे नवसुपे , मध्य शहर प्रमुख अभीजीत भगत, विद्यार्थी शहर जिल्हा अध्यक्ष  कृष्णा अम्रुते , किरण रोकडे, ओंकार भोसले, राज गोसावी, दिपक ताडला, साहिल पवार, गणेश भुजबळ, समर्थ ढेरेकर, मोन्या पाडळे, उपस्थित होते .
प्रोफेसर चौक व अप्पुहत्ती चौक या दरम्यान काही मनपा ठेकेदार एजन्सीद्वारे जाहिरात कमानीचे कामे होऊन त्या निकृष्ट व  एमएससीबी खांब व 1100 के.व्ही.सी. पॉवरच्या वायर न काढल्याने या कमानीला चिटकवून बहुतांश मृत्यू व अपघात झाले आहेत . तरी जी ठेकेदार एजन्सीची चूक आहे . तीने एमएससीबी व मनपास या विद्युत वाहिनीच्या वायर काढण्याची कार्यवाही केलेली नाही . यामुळे  दोन ते तीन युवकांचे मृत्य व अपघात झालेले असून भविष्यात वादळ व पावसामुळे कमानी पडून जिवीतहानी होऊ शकते . दरम्यान काही झाल्यास मनपा व ठेकेदार त्यास जबाबदार राहील . तसेच या धोकादायक कमानी त्वरित 10 दिवसात काढून घ्याव्या , अन्यथा  शिव राष्ट्र सेनेच्या वतीने उपोषण करू याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा निवेदनातून केला आहे .