शैक्षणिक कामासाठी लागणारे दाखले व प्रमाणपत्रे वेळेवर विद्यार्थ्यांना मिळण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन
अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांना दाखले व प्रमाणपत्रे काढून देण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचा आरोप - माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक.
अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकतेच दहावी व बारावीचे निकाल लागले असून विद्यार्थ्यांची पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया करिता विविध दाखल्याची आवश्यकता असते परंतु अहमदनगर तहसील कार्यालय येथून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र प्राप्त करण्याकरिता 21 दिवसाचा शासन कालावधी लागत असून या दाखल्याला एक महिन्याच्या वर वेळ होऊन गेला तरीही प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना मिळत नाही तसेच जातीच्या दाखल्यामध्ये शासन निर्णयानुसार पूर्तता करून सुद्धा अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांना टाळाटाळ व अडवणूक करत आहे या अडवणुकीमुळे सुशिक्षित अल्पसंख्यांक तरुण वर्ग मानसिक तणावाखाली जात असून याची दखल घ्यावी तसेच शासनाचे विविध प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना वेळेवर न मिळाल्यास शैक्षणिक नुकसान होऊ शकतो तरी सर्व विद्यार्थ्यांना मुदतीच्या आत दाखले व प्रमाणपत्र शासन निर्णयानुसार वेळेत देण्याच्या मागणीसाठी अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक समवेत विद्यार्थी उपस्थित होते