संघर्षात अमेरिकेची उडी

इराणच्या तीन अनु केंद्रांवर 'बंकर बस्टर' हल्ला!

🌍
संघर्षात अमेरिकेची उडी — इराणच्या तीन अनु केंद्रांवर ‘बंकर बस्टर’ हल्ला!

📌 तेहरान/वॉशिंग्टन, 22 (PTI)
इराण-इस्राइल संघर्षात अमेरिकेने उडी घेतली आहे. आज पहाटे इराणमधील नातांझ, फोदो॔ आणि इस्फहान या तीन अणुकेंद्रांवर बंकर बस्टर बॉम्ब टाकण्यात आले.
➡️ अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्यात या तिन्ही अनु केंद्रांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केला आहे.
➡️ इराणने प्रत्युत्तर देत स्पष्ट इशारा दिला की, “आता चर्चा करण्याची वेळ संपली आहे. आमच्या संरक्षणाचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे!”

⚡ इस्राइलवर इराणचा प्रतिहल्ला:
इराणने इस्राइलवर क्षेपणास्त्रांचा मारा केला आणि काही प्रमाणात नुकसान घडवले.
➡️ इस्राइलमधील 80 हून अधिक लोक जखमी
➡️ तेल अवीव मधील इमारती आणि रस्त्यांचे नुकसान

🚀 अमेरिकेचा हल्ला:
➡️ B2 बॉम्बर्समधून 13,000 किलो वजनाचे बंकर बस्टर बॉम्ब वापरले
➡️ जमिनीखालील फोदो अनु केंद्राच्या प्रवेशद्वाराचे मोठे नुकसान
➡️ डोंगर फाटल्याने अनुकेंद्राचा प्रवेशमार्ग बंद

🛰 उपग्रह छायाचित्रांवरून दिसले:
फर्द अनु केंद्राच्या प्रवेशद्वाराचे नुकसान झाले आहे. केंद्राचे कामकाज सुरू ठेवण्यासाठी मलबा हटवावा लागणार आहे.

🇺🇸 ट्रम्प यांचा इशारा:
“हे युद्ध संपवण्यासाठी इराणी आता तयार व्हावे.”

🇮🇱 इस्राइलचा प्रतिसाद:
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ट्रम्प यांचे आभार मानले.
इस्राइलने इराणच्या क्षेपणास्त्र यंत्रणांवर हल्ला करत ती नष्ट केल्याचा दावा केला आहे.

📝 इराण अणुऊर्जा संघटनेचा खुलासा:
“किरणोत्सर्ग झालेला नाही.”

⚠️ प्रादेशिक युद्धाचा धोका वाढला आहे!