हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांचा वाढदिवस वृक्षरोपणाने साजरा
वर्षभर वृक्षरोपण व संवर्धनासह विविध सामाजिक उपक्रम राबविणार्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील भगवान गौतमबुध्द जॉगींग पार्कमध्ये ग्रुपच्या सदस्यांचा वाढदिवस वृक्षरोपण अभियानाने साजरा करण्यात आला. हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य अजय खंडागळे, सचिन खिस्ती, भास्कर भालेराव, आदिनाथ रासकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इतर सर्व खर्चांना फाटा देत वृक्षरोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. तर लावण्यात आलेल्या झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी वाढदिवस असलेल्या सदस्यांनी उचलली आहे. ग्रुपच्या प्रत्येक सदस्याचा वाढदिवस वृक्षरोपणाने साजरा करण्याचा पायंडा ग्रुपने निर्माण केला आहे.
वृक्षरोपण अभियानाची सुरुवात ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांच्या हस्ते रोप लाऊन करण्यात आली. यावेळी रमेश वराडे, दिपक बडदे, मेजर दिलीप ठोकळ, सुभाष गोंधळे, बाबासाहेब बेरड, किशोर (पिटू) बोरा, विकास भिंगारदिवे, विलास दळवी, दिपक घोडके, जालिंदर बोरुडे, दिलीप बोंदर्डे, सुधाकर चिदंबर, राजू कांबळे, विशाल बोगावत, सुहास देवराईकर, संतोष लुणिया, सुनिता वराडे, प्रांजली सपकाळ, मनिषा बोगावत, जयकुमार मुनोत, सर्वेश सपकाळ, सुरेश कानडे, रमेश कडूस, विकास निमसे, किरण फुलारी, सुर्यकांत कटोरे, विनोद खोत, हरिश साळुंके, सुरेंद्रसिंह सोहेल, महेश सरोदे, अशोक पराते, योगेश करांडे, धनंजय नामदे, सचिन कस्तुरे, मुकेश क्षीरसागर, नागेश खुरपे, माजिद शेख, उत्तम वाघस्कर, सुयोग चेंगेडिया, विशाल भामरे, राजाभाऊ चेंगेडिया, प्रविण परदेशी, प्रविण भोसले, यश भालेराव, दिपील गुगळे, सिताराम परदेशी, रामनाथ गर्जे आदी ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, मनुष्याला ऑक्सिजन रुपाने जीवन देण्याचे काम वृक्ष करतात. त्यामुळे जगण्यासाठी वृक्षरोपणाशिवाय पर्याय नाही. कोरोनाच्या संकटकाळात ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांना लक्षात आले. झाडांकडून ऑक्सिजन मिळवण्यासाठी वृक्षांना जगविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. वृक्षरोपणाने पर्यावरणाचा समतोल साधला जाणार असल्याने सामाजिक उत्तरदायित्व म्हणून प्रत्येकाने एक झाड लावण्याचे त्यांनी सांगितले.
हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने वर्षभर वृक्षरोपण व संवर्धन मोहिम राबविली जाते. ग्रुपच्या प्रत्येक सदस्यांचा वाढदिवस वृक्षरोपणाने साजरा केला जातो. प्रत्येक रविवारी ग्रुपचे सदस्य लावलेल्या झाडांना जाऊन स्वत: पाणी देत असतात. ही मोहिम वर्षभर चालू असून, याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रुपच्या वतीने भुईकोट किल्ला, चांदबिबी महाल, भिंगार परिसरात लावण्यात आलेली झाडे जगविण्यात आली असल्याचे ग्रुपच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.