हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सिंधूताई सपकाळ यांना भिंगारमध्ये श्रध्दांजली
अनाथांसाठी सेवा कार्य करणार्या सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांचे निधन झाले असता, भिंगार मध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली. भगवान गौतमबुध्द जॉगिंग पार्कमध्ये सिंधूताई सपकाळ यांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांच्या सामाजिक कार्याला सलाम करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, रमेश वराडे, दीपक बडदे, मेजर दिलीप ठोकळ, माजी नगरसेवक किशोर बोरा, सचिन चोपडा, सुभाष गोंधळे, सर्वेश सपकाळ, श्रीरंग देवकुळे, बाबासाहेब बेरड, सुधाकर चिदंबर, दीपक घोडके, विकास भिंगारदिवे, मनोहर पाडळे, संतोष लुणिया, सुंदरराव पाटील, सरदारसिंग परदेशी, अशोक दळवी, दिलीप बोंदर्डे, अशोक पराते, अभिजीत सपकाळ, सुहास देवराईकर, नामदेव जावळे, सिताराम परदेशी, रमेश कडूस, सुयोग चंगेडिया, धनंजय नामदे, जालिंदर अळकुटे, माजिद शेख, राजू कांबळे, नवनाथ खराडे, सचिन चेमटे, सूर्यकांत कटोरे, राजेंद्र येळीकर, विकास निमसे, दिनेश परदेशी, उषाताई ठोकळ, मीनाक्षी खोगरे, पूनम तरवडे, शिल्पा स्वामी आदींसह ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाने अनाथांची माय हरपली आहे. अनाथ बालकांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या शिक्षणापासून ते उज्वल भविष्याची जबाबदारी सिंधूताई यांनी समर्थपणे पेलवली. कुटुंबातील एक किंवा दोन मुलांचे भवितव्य घडविणे अवघड असताना सिंधूताईंनी संघर्षमय जीवनातून अनेक अनाथांचे अंधारमय जीवन प्रकाशमय केले. त्यांचे कार्य समाजाला दिशादर्शक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.