हरिनामाच्या गजरात भगवानगड दुमदुमला!
"संत श्री भगवान बाबा की जय, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम" या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला


पंढरपूर आषाढी वारीच्या निमित्ताने भगवानगडावरून पालखी प्रस्थान सोहळा मंगळवारी दुपारी ४ वाजता मोठ्या भक्तिभावात पार पडला. “संत श्री भगवान बाबा की जय, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम” या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला.
पालखीवर फुलांची उधळण झाली आणि टाळ-मृदंगाच्या गजरात हजारो भाविक हरिभक्त निघाले पंढरीच्या वाटेवर. पहिला मुक्काम गडाच्या पायथ्याशी असलेल्या भारजवाडी येथे झाला.
पालखी मार्ग:
भगवानगड → भारजवाडी → बावी → खोकरमोह → करंजवन → डिघोळ → जयवंतनगर → कुंबेफळ → पिंपरी → कुर्डूवाडी → ढेकळेवाडी → पंढरपूर
विशेष दिंड्या:
अंभोरे येथील भोसले महाराजांची दिंडी, गुंजमूर्ती संस्थान शेषाबाई संस्थान तांबवा, रामगड, विठ्ठल गड, रामेश्वर, सुपेसावरगांव भगवानबाबा संस्थान, महालक्ष्मी भोगलवाडी, राजा हरिश्चंद्र, बोरकिनी संत भगवानबाबा, भागेश्वर तरडगव्हण, गणपत बाबा सावरगाव, मंडलेश्वर घोगस पारगांव, सिद्धेश्वर शिरूर कासार, मायंबा भालगाव, भगवानबाबा छत्रपती संभाजीनगर-पैठण-आळंदी आदींचा सहभाग!
महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्थान झाले.
पहिल्या दिवशीच ४५,००० वारकऱ्यांचा सहभाग!
वारी पुढे जात असताना ही संख्या पंढरपूरला पोहोचेपर्यंत १ लाखापर्यंत पोहोचते. गडावर शेकडो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले.
चला, आपणही या भक्तिरसात न्हाऊन निघूया. हरिनामाचा गजर आपल्या हृदयात रूजवूया. विठू माऊलीच्या वारी त एकरूप होऊया!
#भगवानगड #आषाढीवारी #पालखीसोहळा #पंढरपूरवारी #हरिनाम #संतपरंपरा #वारी2025 #श्रीविठ्ठल #वारकरीसंप्रदाय