हाजी अजीजभाई प्रतिष्ठान व सिटीकेअर रुबी हॉस्पिटलच्या वतीने शुक्रवारी झेंडीगेट येथे मोफत सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन
हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठान व सिटीकेअर रुबी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील गरजू घटकांसाठी शुक्रवार दि.4 फेब्रुवारी रोजी झेंडीगेट, नालसाहब चौक येथे मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते तर माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली या शिबीराचे उद्घाटन होणार असून, या शिबीराप्रसंगी उपमहापौर गणेश भोसले, अस्थिरोग तज्ञ डॉ. संदीप सुराणा, मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.
अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठानचे अकलाख शेख यांचा पुढाकारातून हे शिबीर होत असून, सकाळी 10 ते दुपारी 3 वाजे पर्यंत हे शिबीर चालणार आहे. यामध्ये तज्ञ डॉक्टर कॅल्शियम, नेत्र, मधुमेह आदी तपासण्या करणार आहेत. कोरोना काळात आर्थिक परिस्थिती बिकट झाली असताना सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा मिळण्याच्या प्रमुख उद्देशाने या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.