⛈️ अलर्ट! पावसाचा कहर सुरूच… पुढील 24 तास मुंबईसह 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट!
राज्यात पावसानं पुन्हा एकदा जोर पकडला आहे
⛈️ अलर्ट! पावसाचा कहर सुरूच… पुढील 24 तास मुंबईसह 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट!
राज्यात पावसानं पुन्हा एकदा जोर पकडला आहे आणि पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागानं मुंबईसह रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ जाहीर केलाय.
🌧️ कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून काही ठिकाणी 100 मिमीहून अधिक पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे.
📍 कोल्हापूर, सांगली, पालघर, नाशिक, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा येथे ‘येलो अलर्ट’ आहे.
📍 25 जुलै रोजी रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पुन्हा रेड अलर्ट, तर ठाणे, मुंबई, नागपूर, भंडारा येथे येलो अलर्ट देण्यात आलाय.
🌊 नद्या दुथडी भरून वाहण्याची शक्यता असल्यामुळे नदीकाठच्या भागांमध्ये पूरस्थिती उद्भवू शकते. प्रशासन सतर्क असून मदत यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
🚨 नागरिकांना आवाहन – अत्यावश्यक नसल्यास घराबाहेर पडू नका, जलभराव, ट्रॅफिक जाम टाळा आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा.