Prev Post
मनपा निवडणूक रणधुमाळीला सुरुवात! भाजपकडून प्रभागनिहाय मोर्चेबांधणी सुरू! 
शहरातल्या १७ प्रभागांतील इच्छुकांची उपस्थिती!
प्रत्येक बुथ, शक्ती केंद्र मजबूत करण्यावर भर!
२९८ पैकी १०१ बुथ आधीच कार्यरत – उर्वरित बुथ्स लवकरच सक्रिय!
मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार रणनिती आखायला सुरुवात केलीय. गेल्या वेळेस निवडून आलेले १४ नगरसेवक – आता आकडा वाढवायचाय! यासाठी प्रभागनिहाय आढावा घेऊन इच्छुकांनी थेट आपापल्या वॉर्डचा राजकीय रिपोर्ट सादर केलाय.
बैठकीत उपस्थित नेते:
अनिल मोहिते, सुनील रामदासी, अशोक गायकवाड, बाबासाहेब वाकळे, अॅड. धनंजय जाधव, निखिल वारे, प्रशांत मुथ्था, प्रिया दानवे आणि अनेक जण.
प्रत्येक कार्यकर्त्याचं माहितीपत्रक भरून घेतलं जातंय – कुणी आधी निवडणूक लढवलंय का? पार्श्वभूमी काय? हेही तपासलं जातंय.
टार्गेट – प्रत्येक प्रभागात मजबूत बुथ नेटवर्क तयार करणे आणि यंदाच्या निवडणुकीत अधिकाधिक जागा भाजपच्या ताब्यात आणणे!
प्रभागनिहाय बुथ बैठका लवकरच!
#ManpaElection2025 #BJPStrategy #BoothSashaktikaran #MetroPortal #PoliticalBuzz #MunicipalPolls #NagarSevak2025 #UrbanPolitics #BJPInAction #ElectionAlert
Prev Post