🕊️ Returned from the pilgrimage… but a farmer’s final decision after police humiliation!

👨‍👩‍👧‍👦 नातेवाईकांचा गंभीर आरोप:

🕊️ वारीतून परतलं पण… पोलिसांच्या अपमानाने शेतकऱ्याचा शेवटचा निर्णय!

🚨 धाराशिव : वाघोलीतील ४८ वर्षीय वारकरी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या!

वारीतून भक्तीभावाने परतलेल्या दत्तू खडके या शेतकऱ्याने रविवारी सकाळी शेतात झाडाला दोर लावून गळफास घेत आत्महत्या केली. वाघोली गावात एकच खळबळ उडाली.

👨‍👩‍👧‍👦 नातेवाईकांचा गंभीर आरोप:
बार्शी पोलिसांनी चोरीच्या प्रकरणात मुलाचा शोध घेताना दत्तू खडके यांना ताब्यात घेऊन लातूर-औसा येथे नेले. तिथे त्यांना शिवीगाळ करत अपमानास्पद वागणूक दिली गेल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
शनिवारी गावात परतल्यावर त्यांनी नातेवाईकांसमोर याचा पाढा वाचला होता. आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी आयुष्य संपवलं.

🧾 सुसाईड नोट नाही, पण भावना स्पष्ट:
अत्यंत वेदनादायक आणि धक्कादायक प्रकारानंतर पोलिस प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

👮 पोलिसांचं स्पष्टीकरण:
“कोणतीही मारहाण, शिवीगाळ किंवा गैरवर्तन केलं नाही” – असा बचाव बार्शी पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी केला आहे.

📢 प्रश्न अनेक, उत्तरं हवीत!
शासन आणि पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी समाजातून होत आहे.

📲 #PoliceConduct #FarmersSuicide #JusticeForKhadke #वारकरीचा_अपमान #EmotionalAbuse #MHNews