108 रुग्णवाहिका चालकांचं बंड! समान काम-समान वेतनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या
मुख्य मागणी – ‘समान काम, समान वेतन’ आणि थकित हक्क मिळावेत!


अहिल्यानगर | १ जुलै
“जीव वाचवणाऱ्यांना न्याय कोण देणार?” असा थेट सवाल करत १०८ रुग्णवाहिकांचे चालक अखेर रस्त्यावर उतरले आहेत. वर्षानुवर्षे सेवाभावाने काम करणाऱ्या चालकांनी आता काम बंद आंदोलन सुरू केलं आहे.
मुख्य मागणी – ‘समान काम, समान वेतन’ आणि थकित हक्क मिळावेत!
रुग्णांच्या मदतीसाठी धावत असलेल्या या ड्रायव्हर्सनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत सरकार आणि बीव्हीजी कंपनीवर थेट आरोप केले.
आंदोलनाची ठळक कारणं:
- वेतनात अन्यायकारक तफावत
- 2014 ते 2017 पर्यंतचा थकित PF मिळालेला नाही
- जादा कामाचा मोबदला नाही
- रुग्णवाहिकांची खराब अवस्था – आग लागण्याचा धोका
- कोविड काळात काम करूनही भत्ता नाकारला
- कोणतीही विमा सुरक्षा नाही
“कोरोना काळात जीव धोक्यात घालून आम्ही सेवा दिली. आता आमच्या हक्कासाठी आम्ही लढतोय!” – असं या आंदोलनात सहभागी चालकांचं म्हणणं आहे.
मागण्या मान्य नाही झाल्या तर आंदोलन उग्र होणार!
१५ जूनपर्यंत चर्चा करून निर्णय घ्या असं सांगितलं होतं, पण कंपनीकडून काहीच हालचाल झाली नाही. त्यामुळे चालक युनियनने बेमुदत आंदोलन सुरू केलं आहे.
आंदोलनात सहभागी प्रमुख संघटक:
अशोक कराळे, अतुल शिंदे, संजय दरवडे, सतीश शिरसाठ, नितीन चेमटे, संजय ओहोळकर, वाल्मीक शितोळे, संतोष चौधरी, भीमराज मोकाटे आणि अनेक कर्मचाऱ्यांची मोठी उपस्थिती.
“न्याय मिळेपर्यंत माघार नाही!” असा निर्धार घेतलेले हे चालक आता सोशल मीडियावर जनतेच्या पाठिंब्याची अपेक्षा ठेवून आहेत.
MetroNews.in साठी विशेष रिपोर्ट
#108Strike #SaveAmbulanceHeroes #EqualPayEqualWork #BVGProtest #DriverRights #JusticeForFrontliners #MetroNewsExclusive #AhilyanagarUpdates
आंदोलनाची ठळक कारणं: