अहमदनगर : इंग्रजी व मराठी माध्यमांसाठी प्रज्ञाशोध परीक्षेची ऑनलाईन नोंदणी सुरू
नगर : प्रज्ञाशोध परीक्षेची ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली आहे. ही परीक्षा 19 जानेवारी 2025 रोजी चौथी व सातवीच्या मराठी व इंग्रजी माध्यमांसाठी, जिल्ह्यातील विविध केंद्रांवर घेतले जाणार आहे. ऑनलाइन नावनोंदणी, परीक्षेचे वेळापत्रक, अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप याविषयीची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नोंदणीची अंतिम तारीख विलंब शुल्कासह 30 नोव्हेंबर 2024 ही आहे. महाविद्यालयात सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत नाव नोंदणी करावी. असे आवाहन करण्यात आले आहे.