डॉक्टर अनिल बोरगे आणि विजय रणदिवे यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी

डॉक्टर अनिल बोरगे आणि विजय रणदिवे यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी

सरकारी तिजोरीतला पैसा स्वतःच्या बँक खात्यात वळविण्याची शक्कल लढवणाऱ्या अहिल्यानगर महापालिकेचे तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे आणि विजय रणदिवे यांना कोतवाली पोलिसांनी अटक केल्यानंतर या दोघांना पहिले नगरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी या दोघांना कोर्टानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

भा द वि कलम ४२० प्रमाणे दाखल गुन्ह्यात बोरगे आणि त्याच्या साथीदाराला अटक केल्यानंतर गुरुवारी त्याला नगर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी मागितली. न्यायालयाने या दोघांना ५ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
        स्वच्छ सर्वेक्षण अभियान आणि इतर राज्याच्या योजनांसाठी सरकारी तिजोरीतून आलेला पैसा सरळ आपल्या खात्यात आणि नातेवाईकांच्या खात्यात वर्ग केल्याचा आरोप या दोघांवर आहे. याची पालिकेत रीतसर चौकशी समिती नेमून चौकशी करण्यात आली. आणि त्यात दोषी आढल्यानानंतर बोरगे आणि विजय रणदिवे या दोघांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. आरोग्य अधिकारी डॉ राजूरकर यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा पोलिसांनी दाखल करून घेतला. या प्रकरणी अधिक तपास करण्यासाठी सरकारी वकिलांनी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली.
 
अहिल्यानगर महापालिकेचे तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांच्याविरुद्ध यापूर्वी दोन ते तीन वेळा गंभीर स्वरुपाच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्याच वेळी जर कठोर कारवाई करण्यात आली असती तर कदाचित डॉक्टर बोरगे यांच्या कामकाजात सुधारणा झाली असती. मात्र डॉक्टर बोरगे यांना कोणी तरी पाठीशी घातलं आणि भ्रष्टाचार करण्यासाठी त्यांना सारं रान मोकळं झालं. सरकारी पैसा वैयक्तिक बँक खात्यात वळविण्याची डॉक्टर बोरगे यांची हिंमत नक्की कशी आणि कोणामुळे वाढली, यामागे कोणाचा वरदहस्त आहे, खरं तर हेच तपासण्याची आता जास्तीत जास्त आवश्यकता आहे.