
संगमनेर | त्वचारोग तज्ज्ञांचा इशारा
पावसाळा सुरू झाला की हवेतला दमटपणा वाढतो आणि याच ओलसर वातावरणात फंगल इन्फेक्शन वेगाने पसरतोय.
➡ ओले कपडे, घाम, सतत दमटपणा – यामुळे केस, नखे, त्वचा आणि तोंडाच्या आतील भागावर बुरशीचा प्रादुर्भाव होतो.
➡ ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे किंवा मधुमेह, जुनाट आजार आहेत – त्यांना धोका जास्त!
डॉ. वर्षा होन (त्वचारोग तज्ञ) यांचा सल्ला:
पावसात भिजल्यानंतर तातडीने कपडे बदला, शरीर कोरडे ठेवा.
एकमेकांचे कपडे वापरणं टाळा.
फंगल इन्फेक्शन हा संसर्गजन्य आजार असल्याने घरातल्या इतरांना होऊ नये म्हणून रुग्णांचे कपडे वेगळे धुवा.
लहान जखमांनाही दुर्लक्ष करू नका — त्या मोठ्या त्वचेच्या संसर्गाचं कारण बनू शकतात.
डॉक्टरांनी लिहून दिलेली अँटीफंगल औषधे नियमित घ्या.
पावसाळ्यात त्वचेसाठी आवश्यक काळजी:
बाहेर पडताना दर्जेदार सनस्क्रीन वापरा
पावसात भिजल्यास अंग व केस त्वरित कोरडे करा
ओले कपडे कधीही घालू नका
ओठ कोरडे पडू नयेत म्हणून लीप बाम लावा
दिवसभरात भरपूर पाणी प्या, अति मेकअप टाळा, चेहरा स्वच्छ ठेवा
धूम्रपान, मद्यपान टाळा; संतुलित आहार घ्या
चांगल्या गुणवत्तेची सौंदर्य प्रसाधने वापरा
तुम्ही पावसाळ्यात कशी काळजी घेताय? तुमचे टिप्स खाली कमेंट करा! 
#RainySeasonCare #SkinHealth #FungalInfection #MonsoonAwareness #StayHealthy #SkinCareTips #DrVarshaHon #YouthForHealth #NagarUpdates